शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

बक्सर मृतांच्या संख्येबाबत दोन अहवालात विरोधाभास; पाटणा हायकोर्टाचे प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 07:10 IST

अधिकृत वेबसाईटवर मृत्यू आणि जन्मनोंदणीसंबंधी माहिती अद्ययावत नसल्यावरूनही राज्य सरकारला फटकारले.

बक्सर (बिहार) : गंगा नदीत मृतदेह आढळल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  पाटणा उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या  दोन अहवालातील विरोधाभासावर प्रश्न उपस्थित करून  पाटणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १९ मेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

बिहारच्या मुख्य सचिवांच्या अहवालात कोरोनामुळे झालेले मृत्यू आणि पाटणा विभागीय आयुक्तांनी नमूद केलेली बक्सर स्मनशनाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या यात ताळमेळ लागत नाही.  अधिकृत वेबसाईटवर मृत्यू आणि जन्मनोंदणीसंबंधी माहिती अद्ययावत नसल्यावरूनही राज्य सरकारला फटकारले.  खंडपीठाने सोमवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना उपरोक्त निर्देश दिले. 

आकडे बोलतातमुख्य सचिवांच्या अहवालात १ मार्च ते १३ मेपर्यंत कोरोनामुळे बक्सरमध्ये फक्त सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, तर विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार ५ ते १४ मेपर्यंत बक्सर येथील स्मशानभूमीत ७८९ मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोर्टाने सरकारला बक्सर  जिल्ह्यात कोरोनाने विविध गटातील किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबत स्पष्टीकरणांसह गुरुवारी पुन्हा उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय