नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एक मोठा अपघात टळला. एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर A350 ला रनवेवर एका बॅगेज कंटेनरची जोरदार धडक बसली. या धडकेत विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू यॉर्कला जाणारे एअर इंडियाच्या A350 विमानाने उड्डाण केले, परंतु इराणी हवाई क्षेत्र बंद असल्याने दिल्लीला परतावे लागले. दिल्लीत उतरल्यानंतर दाट धुक्यात विमान धावपट्टीवरून जात असताना, एका कंटेनरने त्याच्या उजव्या इंजिनला धडक दिली. या घटनेत विमानाच्या इंजिनचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
विमान ग्राउंडेड; तपास व दुरुस्ती सुरू
या घटनेनंतर खबरदारी म्हणून संबंधित विमान तपास व दुरुस्तीसाठी ग्राउंडेड करण्यात आले आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “विमान सध्या सखोल तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी ग्राउंडेड ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काही मार्गांवरील उड्डाणांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.” प्रवक्त्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.
अमेरिकेसाठीची काही उड्डाणे रद्द
इराणचे हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाने गुरुवारी अमेरिकेसाठीला जाणारी किमान तीन उड्डाणे रद्द केली. यामध्ये दिल्लीहून न्यूयॉर्कसाठी एक उड्डाण, दिल्लीहून नेवार्कसाठी एक उड्डाण आणि मुंबईहून न्यूयॉर्कसाठीच्या एका उड्डाणाचा समावेश आहे.
Web Summary : A major accident was averted at Delhi airport when an Air India A350 plane, returning from a New York flight due to Iranian airspace closure, collided with a baggage container upon landing. The plane's engine was damaged, and it is now grounded for repairs. Several US-bound flights were canceled.
Web Summary : दिल्ली एयरपोर्ट पर एक बड़ा हादसा टल गया जब एयर इंडिया का ए350 विमान, ईरानी हवाई क्षेत्र बंद होने के कारण न्यूयॉर्क से लौटते समय, उतरते ही एक सामान कंटेनर से टकरा गया। विमान का इंजन क्षतिग्रस्त हो गया है, और अब यह मरम्मत के लिए खड़ा है। अमेरिका जाने वाली कई उड़ानें रद्द कर दी गईं।