विमानाच्या कॉकपिटमध्ये घुसणाऱ्या प्रवाशास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 04:46 IST2018-08-05T04:46:07+5:302018-08-05T04:46:16+5:30
इटलीमधील मिलान येथून २०० प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने दांडगाई करत वैमानिक कक्षात (कॉकपिट) घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान पुन्हा माघारी वळवून त्या प्रवाशास पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

विमानाच्या कॉकपिटमध्ये घुसणाऱ्या प्रवाशास अटक
नवी दिल्ली : इटलीमधील मिलान येथून २०० प्रवाशांना घेऊन दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाने दांडगाई करत वैमानिक कक्षात (कॉकपिट) घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान पुन्हा माघारी वळवून त्या प्रवाशास पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुरुवारी रात्री या विमानाने मिलान येथून रात्री ९ वाजता उड्डाण केले. त्यानंतर थोड्याच वेळात ३२ सी क्रमांकाच्या आसनावर बसलेल्या गुरप्रीत सिंग या प्रवाशाने ‘कॉकपिट’मध्ये जाण्यासाठी दंगामस्ती सुरू केली. समजूत घालूनही तो ऐकत नाही असे दिसल्यावर सुरक्षेच्या कारणाने वैमानिकाने विमान पुन्हा मिलानला नेण्याचे ठरविले. मात्र सलग आठ तासांच्या प्रवासाला पुरावे यासाठी इंधनाची टाकी उड्डाणापूर्वी ‘फूल’ केली होती. विमान अनपेक्षितपणे माघारी वळवल्याने ते सुरक्षित उतरविता यावे यासाठी वैमानिकाने टाकीतील थोडे इंधन कमी केले. तासाभराने ते मिलान येथे पुन्हा उतरल्यानंतर दांडगट प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधीन करून अडीच तासांच्या विलंबाने विमान दिल्लीकडे पुन्हा निघाले. (वृत्तसंस्था)