मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतके रक्त संकलित करणार
By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:13+5:302014-12-16T23:44:13+5:30
नागपूर : राष्ट्रीय नागपूर कॉपार्ेरेशन एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे १९ डिसेंबरला सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके रक्त संकलित केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतके रक्त संकलित करणार
न गपूर : राष्ट्रीय नागपूर कॉपार्ेरेशन एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे १९ डिसेंबरला सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके रक्त संकलित केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. संकलित रक्त सेवाभावी ब्लड बँकेकडे सोपविण्यात येईल. ते ेगरजू व गरीब सिकलसेल व थॅलेसिमिया रुग्णांना उपलब्ध के ले जाईल. मनपाचे कर्मचारी व पदाधिकारी रक्तदान करणार आहेत. विशेष म्हणजे फडणवीस हे या संघटनेचेही अध्यक्ष आहेत. महापौर प्रवीण दटके रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी राहतील. या सेेवाभावी उपक्रमाला मनपा कर्मचारी संघटना, सहकारी बँक कर्मचारी संघटना, ऐवजदार संघटना सहकार्य करीत आहे.(प्रतिनिधी)