शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

समान नागरी कायद्याबाबत काँग्रेसचे ‘वेट अँड वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:17 IST

विरोधी पक्षांकडूनही पाठिंबा मिळण्याची भाजपने व्यक्त केली आशा

नवी दिल्ली : समान नागरी कायद्यासंदर्भात (यूसीसी) काँग्रेसने शनिवारी ‘पहा आणि प्रतीक्षा करा’ (वेट अँड वॉच) भूमिका घेतली असून या टप्प्यावर हा मुद्दा काढण्याची काहीच गरज नाही, मसुदा विधेयक किंवा या विषयावरील अहवाल आल्यानंतर पाहू, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, भाजपने मात्र विरोधी पक्षांतूनही पाठिंबा मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीच्या सदस्यांची ३ जुलै रोजी वैयक्तिक कायद्यांच्या पुनरावलोकनावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. कायदा आयोगाला वैयक्तिक कायद्यावर (समान नागरी कायदा) आपला अहवाल सादर करायचा आहे आणि या विषयावर विधि आयोग आणि केंद्रीय कायदा मंत्रालयाची मते काय आहेत, याची काँग्रेस पक्ष वाट पाहणार आहे. 

भाजपची काँग्रेसवर टीका भाजपने यूसीसीच्या मुद्यावर विरोधी पक्षांचा (क्रॉस-पार्टी) पाठिंबा मिळेल, अशी आशा व्यक्ती केली आहे. भाजपकडे बहुमत आहे; परंतु आम्हाला वाटते की, इतर पक्षांमधील अनेक नेतेदेखील देशाची एकजूट करू इच्छितात, असा टोला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लगावला. मला वाटते, ‘‘काँग्रेस आणि त्यांचे नेते घाबरले आहेत. सर्वांनी एकत्र येऊन कायदा आणणे ही काळाची गरज आहे. संविधान निर्मात्यांनीही हे ७० वर्षांपूर्वीच सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयानेही पाच वेगवेगळ्या सुनावणीदरम्यान हेच सांगितले आहे.”

यूसीसीला विरोध नाही, पण... : मायावतीबसपा समान नागरी कायद्याच्या कल्पनेला विरोध करत नाही; परंतु भाजप आणि त्यांचे सरकार देशात ज्या पद्धतीने ते लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, त्याला समर्थन देऊ शकत नाही, असे मत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी व्यक्त केले.घटनेत सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे; परंतु तो लादण्याची तरतूद नाही, असेही त्या म्हणाल्या.

केरळ मुस्लीम संघटनेचा विरोधयूसीसी लागू करण्याच्या केंद्राच्या भूमिकेला मुस्लिम संघटना तीव्र विरोध करत आहेत. यासदर्भात, सुन्नी-शफी विद्वानांची संघटना असलेल्या ऑल केरळ जमियत-उल-उलेमाने रविवारी सूचित केले की, ते प्रस्तावित कायद्याला विरोध करणार आहेत.  राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने यूसीसीची गरज नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाcongressकाँग्रेसBJPभाजपा