शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
3
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
4
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
5
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
6
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
7
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
8
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
9
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
10
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
11
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
12
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
13
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
14
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
15
Vastu Tips: आर्थिक चणचण असो नाहीतर वास्तू दोष; तुरटीचा छोटा तुकडा बदलेल तुमचे नशीब 
16
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
17
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये उद्धवसह राज यांची संयुक्त सभा! ठाकरे ब्रँडच्या जादूसाठी प्रयत्न
18
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
19
मूळ पाकिस्तानी असलेला 'हा' वादग्रस्त क्रिकेटर निवृत्त; ऑस्ट्रेलिया टीममध्ये केले होते मोठे कांड
20
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास

By संतोष कनमुसे | Updated: January 2, 2026 12:12 IST

कर्नाटक काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत राज्यात एक सर्व्हे केला आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेवर टीका केली. काँग्रेस फक्त हरल्यावरच संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आणि जिंकल्यावर त्याच व्यवस्थेचा आनंद साजरा करते. भाजपाने याला सोयीचे राजकारण म्हटले.

काँग्रेस मागील काही दिवसांपासून ईव्हीएम मशिनबाबत वेगवेगळे दावे करत आहे. खासदार राहुल गांधींनीही यावरून निवडणूक आयोगावर आरोप केले आहे. ईव्हीएम मशिनबाबत कर्नाटक सरकारने एक अधिकृत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये ईव्हीएमवरील प्रश्नाला नवीन वळण दिले आहे. सर्व्हेक्षणानुसार, कर्नाटकातील जनतेचा एक मोठा वर्ग ईव्हीएम सुरक्षित आणि अचूक मानतो. या निकालांनंतर, राहुल गांधी यांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली. 

कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) व्ही. अंबुकुमार यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १०२ विधानसभा मतदारसंघांमधील ५,१०० लोकांची मते घेण्यात आली.

विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...

या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या एकूण ८३.६१% लोकांनी ईव्हीएम विश्वसनीय असल्याचे सांगितले. ईव्हीएम अचूक निकाल देतात यावर ६९.३९% लोकांनी सहमती दर्शवली, तर १४.२२% लोकांनी यावर 'पूर्ण सहमती' व्यक्त केली. लेक कलबुर्गीमध्ये ईव्हीएमवर सर्वाधिक विश्वास दिसून आला, तिथे ९४.४८% लोक मतदान यंत्राच्या बाजूने होते. म्हैसूरमध्ये ८८.५९% लोकांनी त्याच्या विश्वासार्हतेला मान्यता दिली. बेंगळुरूमध्ये ६३.६७% लोकांनीही यावर सहमती दर्शविली.

भाजपचा पलटवार

सर्वेक्षणाचे निकाल जाहीर होताच, भाजपने याला काँग्रेससाठी लाजिरवाणे म्हटले. कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले की, "वर्षानुवर्षे राहुल गांधी देशभरात एकच गोष्ट पसरवत आहेत. भारताची लोकशाही धोक्यात आहे आणि ईव्हीएम अविश्वसनीय आहेत. पण कर्नाटकातील काँग्रेस सरकारने केलेल्या सर्वेक्षणातून वेगळीच गोष्ट समोर येते. ही काँग्रेसच्या तोंडावर चापट आहे, असा निशाणा त्यांनी लगावला.

"काँग्रेस फक्त हरल्यावरच संस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते आणि जिंकल्यावर त्याच व्यवस्थेचा उत्सव साजरा करते, असंही ते म्हणाले. त्यांनी काँग्रेसचे हे सोयीचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे, या दरम्यान हा सर्व्हे घेण्यात आला आहे. ईव्हीएमवरील जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे, असा दावा त्यांनी केला होता. भाजपने यावर टीका केली.  सरकारच्या स्वतःच्या सर्वेक्षणात जनतेचा प्रचंड विश्वास दिसून येत असताना सरकार राज्याला मागे का नेत आहे?, असा सवाल भाजपाने केला. भाजपच्या मते, मतपत्रिकेकडे परतणे हा निवडणुका हाताळण्याचा आणि विलंब करण्याचा प्रयत्न आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही काळापासून ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही त्यांनी "ब्लॅक बॉक्स" आणि "व्होट चोरी" सारखे शब्द वापरून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर टीका केली. दरम्यान, आता त्यांच्याच राज्य सरकारने केलेल्या या सर्वेक्षणामुळे काँग्रेसच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress's survey contradicts Rahul Gandhi's EVM claims; people trust machines.

Web Summary : Karnataka's survey reveals high public trust in EVMs, contradicting Rahul Gandhi's 'vote theft' allegations. 83.61% find EVMs reliable, with strong support in Kalaburagi and Mysuru. BJP criticizes Congress for questioning institutions only after losses.
टॅग्स :congressकाँग्रेसEVM Machineईव्हीएम मशीनRahul Gandhiराहुल गांधी