उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा ङोंडा
By Admin | Updated: July 26, 2014 02:47 IST2014-07-26T02:47:05+5:302014-07-26T02:47:05+5:30
लोकसभा निवडणुकीत देशभरात दिसलेली ‘मोदी’लाट ओसरत असल्याचे संकेत उत्तराखंड विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकांनी दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा ङोंडा
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीत देशभरात दिसलेली ‘मोदी’लाट ओसरत असल्याचे संकेत उत्तराखंड विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकांनी दिले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी मोदीलाटेत उत्तराखंडच्या सर्व पाच जागा काबीज करणा:या भाजपाच्या उत्तराखंडमध्ये सरकार बनविण्याच्या स्वप्नाला हा जबर हादरा मानला जात आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत तिन्ही जागा काबीज करीत काँग्रेसने या पक्षाला लोळवले आहे.
दुसरीकडे तिन्ही जागांवर ङोंडा रोवणा:या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांमध्ये अतिशय वाईट परिस्थितीतून जावे लागत असताना या विजयाने एकप्रकारे राजकीय संजीवनी मिळाली आहे. हा विजय काँग्रेससाठी सुखद संदेश असल्याचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी म्हटले आहे. जनता पुन्हा काँग्रेसला शक्ती देऊ इच्छित आहे. या विजयामुळे रावत यांचे काँग्रेसमधील वजन वाढले हे स्पष्टच आहे.
काँग्रेसने धारचुला या मतदारसंघाची जागा कायम राखत डोईवाला आणि सोमेश्वर या दोन जागा भाजपाकडून हिसकावून घेतल्या. मुख्यमंत्री हरीश रावत हे धारचुला मतदारसंघात 2क्,6क्4 मतांनी विजयी झाले. डोईवाला येथे काँग्रेसचे हिरासिंग बिश्त सहा हजार मतांनी विजयी झाले. सोमेश्वर राखीव मतदारसंघात काँग्रेसच्या रेखा आर्य यांनी भाजपावर नऊ हजार मतांनी मात केली. 21 जुलै रोजी मतदान झाले होते. काँग्रेसचे आमदार हरीश धामी यांनी धारचुलाची जागा रावत यांच्यासाठी रिक्त केली होती. दोन जागांवर भाजपाचे आमदार लोकसभेत निवडून गेल्यामुळे पोटनिवडणूक घेण्यात आली.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडची धुरा सांभाळणारे हरीश रावत यांना सहा महिन्यांत म्हणजे 31 जुलैर्पयत विधानसभेवर निवडून येणो आवश्यक होते. त्यांच्या विजयामुळे काँग्रेस मजबूत झाली आहे. 7क् सदस्यीय विधानसभेत काँग्रेस आमदारांची संख्या आता 35 झाली असून, बहुमतासाठी केवळ एका जागेची कमतरता आहे. 2क्12 च्या विधानसभा निवडणुकीत 31 जागा जिंकणारी भाजपा काँग्रेसपेक्षा केवळ एका जागेने मागे होती. भाजपाचे संख्याबळ आता 28 वर आले आहे. पुरोगामी लोकशाही आघाडीचे (पीडीएफ) सात सदस्य सरकारमध्ये सहभागी आहेत.