योजना आयोग गुंडाळण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध
By Admin | Updated: August 20, 2014 01:03 IST2014-08-20T01:03:02+5:302014-08-20T01:03:02+5:30
नियोजन आयोग संपुष्टात आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा दुर्दैवी असल्याचे सांगत काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आह़े

योजना आयोग गुंडाळण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
नियोजन आयोग संपुष्टात आणण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा दुर्दैवी असल्याचे सांगत काँग्रेसने सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आह़े मोदींचे असे निर्णय एकदिवस महत्त्वपूर्ण मुद्यांवर राष्ट्रीय सहमतीची परंपराच
संपवतील, असा इशाराही काँग्रेसने दिला आह़े
माजी वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी आज मंगळवारी यानिमित्ताने मोदी सरकारवर जोरदार ताशेरे ओढल़े देशाची चौकट शाबूत राहण्यासाठी नियोजन आयोगाच्या मुद्यावर मोदींनी सर्वप्रथम राज्यांना विश्वासात घेणो आवश्यक होत़े राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक बोलावून ते विचारमंथन करू शकले असत़े पण असे न करता
त्यांनी घाईघाईने नियोजन आयोग संपुष्टात आणण्याचा निर्णय जाहीर केला़ साहजिकच काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देणार नाहीत, असे शर्मा म्हणाल़े
च्नियोजन आयोग पुनर्गठित करण्याची गरज होती़ संपविण्याची नाही़ खुद्द माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही नियोजन आयोगाच्या पुनर्गठनाची शिफारस केली होती़ त्यांच्या निर्देशावर माँटेकसिंह अहलुवालिया यांनी 15 पानांची नोट तयार केली होती़ ती सध्या सरकारजवळ आहे आणि सरकारने ती सार्वजनिक करावी, असेही ते म्हणाल़े