राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये विचारमंथन

By Admin | Updated: June 6, 2014 22:30 IST2014-06-06T22:30:01+5:302014-06-06T22:30:01+5:30

281 खासदारांच्या बहुमताच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचा चेहरामोहरा बदलण्याच्या कामाला लागले आहेत.

Congressional vote for the Rajya Sabha | राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये विचारमंथन

राज्यसभेसाठी काँग्रेसमध्ये विचारमंथन

>शीलेश शर्मा - नवी दिल्ली
281 खासदारांच्या बहुमताच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचा चेहरामोहरा बदलण्याच्या कामाला लागले आहेत. मंत्रिमंडळाची स्थापना करताना त्यांनी वयाची 75 ओलांडलेल्या नेत्यांना अलगद बाजूला सारले. परिणामी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह समस्त बडे नेते एका कोप:यात उभे असलेले दिसत आहेत. परंतु केवळ 44 खासदार असलेला काँग्रेस पक्ष राज्यसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावे शोधण्याचाच प्रय} करताना दिसत आहे.
कर्नाटकमधून राज्यसभेच्या जागा भरावयाच्या आहेत. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ पाहता येथे काँग्रेस तीन जागा जिंकण्याची शक्यता आहे आणि या तीन जागांसाठी काँग्रेस नेतृत्व उमेदवाराचा शोध घेत आहे.
नंदन निलेकणी यांना राज्यसभेचे तिकीट देण्याचा प्रस्ताव पक्षाच्या काही नेत्यांनी पुढे केलेला आहे.  निलेकणी हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत आणि पक्षाने अशाच स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांच्या नावाचा विचार करण्याची गरज आहे. निलेकणी यांना राज्यसभेवर पाठविले तर काँग्रेस पक्ष आपले विचार बदलण्याच्या तयारीत असल्याचे संकेत जातील, असा निलेकणी समर्थक नेत्यांचा युक्तिवाद आहे. निलेकणी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.
एस. एम. कृष्णा हे 82 वर्षाचे झाले आहेत. त्यांच्या निष्क्रियतेमुळेच त्यांना परराष्ट्र मंत्रिपदावरून हटविण्यात आले होते. बी. के. हरिप्रसाद 6क् वर्षाचे आहेत. परंतु त्यांचा कोणताही जनाधार नाही. चिदंबरम आता 69 वर्षाचे झाले आहेत. परंतु त्यांचे अर्थशास्त्रवर प्रभुत्व असल्याने नवे वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर अंकुश ठेवण्यात ते महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील, असा पक्षाच्या बडय़ा नेत्यांचे म्हणणो आहे.
आता कोणत्या नेत्याला कोणत्या आधारावर राज्यसभेची उमेदवारी द्यायची या संभ्रमात काँग्रेस नेतृत्व सापडले आहे. दरम्यान भाजपाने प्रकाश जावडेकर यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री असलेले जावडेकर सध्या संसदेचे सदस्य नाहीत. बिहारमधून काँग्रेससाठी शुभवार्ता आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांना पाठिंबा देण्याची संयुक्त जनता दलाची तयारी आहे असे दिसते. संजदने आता बिगर काँग्रेसवादाचा त्याग करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे काँग्रेसने बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीत संजदकडे पाठिंब्याची विनंती केली तर पक्ष त्यावर अवश्य विचार करेल, असे संजदचे नेते के. सी. त्यागी यांनी लोकमतला सांगितले. संजदचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांच्याशी काँग्रेसचे नेते संपर्क ठेऊन आहेत आणि लवकरच अहमद यांना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
 
4सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा आणि पक्षाचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांची नावे पक्की मानली जात आहेत. तिस:या जागेसाठी माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या नावावर विचार सुरू आहे. तथापि बाहेरच्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी देण्याला राज्यातील काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. परंतु काँग्रेस नेतृत्व ज्या नावांवर विचार करीत आहेत, त्यात चिदंबरम यांचेही नाव आहे.

Web Title: Congressional vote for the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.