लखनौ - काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रियंका गांधी यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधीलकाँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी जोरदार पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांनी दुर्गा अवतारामध्ये दाखवले आहे.लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या एका पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना वाघावर स्वार झालेल्या दुर्गेच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. माँ दुर्गेचे रूप असलेल्या भगिनी प्रियंका जी यांचे स्वागत असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.
लखनौमध्ये काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार, दाखवला प्रियंका गांधींचा दुर्गा अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 11:23 IST
काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रियंका गांधीं यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
लखनौमध्ये काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार, दाखवला प्रियंका गांधींचा दुर्गा अवतार
ठळक मुद्देप्रियंका गांधी यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लखनौमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जोरदार पोस्टरबाजी केली आहे.पोस्टरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांनी दुर्गा अवतारामध्ये दाखवले आहे. माँ दुर्गेचे रूप असलेल्या भगिनी प्रियंका जी यांचे स्वागत असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.