शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

2019 मध्ये काँग्रेसची खरी ताकद दिसेल- राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 15:50 IST

पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींची चौफेर टीका

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केलीय. डोकलाम, शेतकऱ्यांचं कर्ज, भ्रष्टाचार, न्यायालयातील 4 न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद या मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधलं. सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन न्याय मागावा लागतो. मात्र तरीही मोदी मूग मिळून गप्प बसतात, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. राहुल गांधींनी मोदींवर सडकून टीका करत 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल फुंकलं. भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा, बँक घोटाळे, राफेल करार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी शांत का बसतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश रॅलीला ते संबोधित करत होते. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ही राहुल यांची दिल्लीतील पहिलीच रॅली होती. कर्नाटकची निवडणूक जवळ आली असताना राहुल गांधींनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'आतापासून येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस जिंकेल आणि 2019 मध्ये ताकद दाखवून देईल,' असं राहुल यांनी म्हटलं. 'न्यायालयं, निवडणूक आयोगापासून आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमध्ये संघाची माणसं आणून बसवली जाताहेत. मोदींनी 2014 च्या निवडणुकीवेळी प्रचार करताना 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 4 वर्षांमधील बेरोजगारीचं प्रमाण गेल्या 8 वर्षांमधील सर्वात वाईट स्थितीत आहे,' असं म्हणत राहुल गांधींनी रोजगाराच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर तोफ डागली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जीएसटीचा उल्लेख गब्बर सिंह टॅक्स असा केला. 'जीएसटीमुळे असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त केलं. चीनमध्ये दर 24 तासांमध्ये 50 हजार रोजगार निर्माण होतात. मात्र भारतात 24 तासांमध्ये रोजगाराच्या केवळ 450 संधी तयार होतात,' असंही राहुल यांनी म्हटलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस