शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

..तर पंतप्रधानपदासाठी काँग्रेस देणार प्रादेशिक नेतृत्वास पाठिंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 14:01 IST

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. एकीकडे पुढील निवडणुका राहुला गांधींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे. मात्र पंतप्रधानपदासाठी...

नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. त्यासाठी मतांची  आणि जागांची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची मोट बांधण्यासाठीही काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे पुढील निवडणुका राहुला गांधींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे. मात्र पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच्या नावास विरोध झाल्यास काँग्रेसकडून प्रादेशिक पक्षांच्या नेत्यास पाठिंबा देण्याची चाचपणी करण्यात येत आहे.  दरम्यान भाजपाने काँग्रेसच्या या रणनीतीवर टिप्पणी करताना या मान्सूनमध्ये पंतप्रधानांचा पाऊस पडत असल्याचा टोला लगावला आहे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपाविरोधी आघाडीचे शिल्पकार म्हणून समोर येतील, अशी काँग्रेसमधील नेत्यांना अपेक्षा आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीने पंतप्रधानपदासाठी राहुल गांधीच्या नावावर विश्वास दर्शवला असला तरी महाआघाडीसाठी विरोधी पक्षांशी सुरू असलेली चर्चा पुढे नेण्यासाठी पक्षाने मोकळेपणाने विचार केला पाहिजे असे, पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे. केंद्रातील भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचणे हीच काँग्रेसची प्राथमिकता आहे. त्यामुळे नेतृत्वाच्या मुद्यावरून विरोधी पक्षांसोबत मतभेद निर्माण करण्याची पक्षाची इच्छा नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  काँग्रेसच्या या भूमिकेमुळे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, बीएसपीच्या मायावती, तसेच समाजवादी पार्टी, आरजेडी असा पक्षांच्या नेतृत्वास दिलासा मिळाला आहे. मात्र प्रादेशिक पक्षांसोबत फरफटत जाण्याचीही काँग्रेसची इच्छा नाही, असेही काँग्रेसमधील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी