शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

मोदींच्या कौरवसेनेला निर्भीड काँग्रेसच रोखेल, राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 6:15 AM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर ‘न भूतो’ अशी तोफ डागून, पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाचा रविवारी घणाघाती समारोप केला.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर ‘न भूतो’ अशी तोफ डागून, पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनाचा रविवारी घणाघाती समारोप केला. मोदी हे आडनाव आता भ्रष्टाचाराचे प्रतीक बनले आहे, असा थेट आरोप करून, आक्रमक राहुल गांधी यांनी मोदींच्या कौरवसेनेला निर्भीड काँग्रेस नक्कीच रोखेल, असा विश्वास व्यक्त केला.हजारो वर्षांनी महाभारताच्या युद्धासारखी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. एकीकडे संघ व भाजपाची कुटिल कौरवसेना आणि दुसरीकडे पांडवांच्या रूपाने काँग्रेस उभी आहे. कौरव असत्याची कास धरून सत्तेसाठी लढत आहेत, तर काँग्रेस पांडवांप्रमाणे सत्याच्या बाजूने उभी आहे. त्यामुळे भीती न बाळगता, या कौरवसेनेच्या विरोधात निर्धाराने उभे राहावे, अशी आश्वासक हाक त्यांनी काँग्रेसजनांना दिली. अलीकडच्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपाच्या पराभवाने दुणावलेला विश्वास राहुल गांधींच्या तासाभराच्या भाषणात ठासून भरलेला होता.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्याने काँग्रेसला सत्ता गमवावी लागली, याची कबुली देऊन राहुल म्हणाले की, आम्ही माणूस आहोत. आमच्याकडून चुका होतात. त्या आम्ही कबूलही करतो, परंतु पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजत असल्याने, ते चुका करूनही काही झाले तरी त्या कबूल करत नाहीत.>भाजपा सत्ताधुंद पक्ष - राहुल गांधीमोदींनी तोंडभरूनआश्वासने दिली, पणती पूर्ण केली नाहीत.मोदी ‘मेक इन इंडिया’च्या घोषणा करतात, पण बाजारपेठा चीनी उत्पादनांनी भरलेल्या आहेत.भाजपा व संघ कौरवांप्रमाणे केवळ सत्तेसाठी लढतात.भाजपावाले मुसलमानांना म्हणतात की, तुम्ही या देशातले नाही, तामिळींना म्हणतात की, तुमची भाषा बदला, ईशान्य भारतातील राज्यांतले लोक जे खातात, ते यांना पसंत नसते.भाजपा हा एका संघटनेचा आवाज, तर काँग्रेस हा या देशातील जनतेचा आवाजकाँग्रेस पक्ष जनतेचा सेवक आहे. बँकांत कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे करून विदेशात पळून जाणाऱ्यांना भाजपा वाचवित आहे.देशातील युवकांनी मोदींवर विश्वास ठेवला. मोदींनी त्या विश्वासाला तडा दिला.काँग्रेस हा सत्यासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे, कोणीही बळजबरीने आम्हाला गप्प बसवू शकणार नाही.इतर कोणत्याही पक्षापेक्षा काँग्रेसच देशाची अधिक प्रगती करू शकतो, हा जनतेला विश्वास आहे.राजकारणात चुका या होतातच, पण त्यातून शिकायलाही मिळते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा