शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणं हेच लक्ष्य- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 19:34 IST

लखनऊमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधींचा रोड शो

लखनऊ: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीउत्तर प्रदेशकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेच्या 80 जागा असलेला उत्तर प्रदेश सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतो. दिल्लीचा मार्ग उत्तर प्रदेशातून जात असल्यानं राहुल यांनी या राज्याची जबाबदारी बहिण प्रियंका आणि तरुण खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवली. यानंतर आज काँग्रेसनं लखनऊमध्ये मोठा रोड शो केला. यामध्ये राहुल गांधींसहप्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. दिल्ली काबीज करण्यासाठी आधी उत्तर प्रदेश काबीज करा, असा स्पष्ट संदेश प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना राहुल यांनी दिला. याशिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या. काँग्रेस पक्षाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. त्यामुळे या राज्यात पक्ष कमकुवत राहू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी लखनऊमधील रोड शोनंतर पक्ष कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'उत्तर प्रदेशात काँग्रेस मजबूत करण्याचं काम प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी झालीच पाहिजे, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं सरकार स्थापन करणं आमचं लक्ष्य आहे. या जबाबदारीपासून एक इंचदेखील मागे हटू नका. प्रियंका, सिंधिया यांच्यासह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक ध्येय समोर ठेवावं,' असं राहुल म्हणाले. काँग्रेस सर्व राज्यात, संपूर्ण देशात बॅकफूटवर नव्हे, तर फ्रंटफूटवर असेल, असंदेखील राहुल यांनी म्हटलं. आम्ही सर्व आव्हानांना निर्भिडपणे सामोरे जाऊ. कारण ही लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला काँग्रेस आहे. प्रेम, बंधूभाव ही आमची विचारधारा आहे. देशाला जोडण्यासाठी आम्ही काम करतो. तर दुसऱ्या बाजूला भाजपा-आरएसएस आणि नरेंद्र मोदींची विचारसरणी आहे. देश तोडायचा, द्वेष निर्माण करायचा, देशाला कमकुवत करायचं हाच त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींनी पाच वर्षात काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशातला तरुण म्हणतोय, चौकीदार चोर है. चौकीदारानं एकालाही रोजगार दिला नाही. दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ, असं मोदी म्हणाले होते. मात्र त्यांनी राफेल डीलमधून अनिल अंबानींना लाभ मिळवून दिला. पंधरा उद्योगपतींचं साडे तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही, असं राहुल म्हणाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा दिल्या.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ