-हरीश गुप्ता, नवी दिल्ली १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांत भाजपप्रमाणेच काँग्रेसची ताकदही काहीशी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या राज्यसभेत काँग्रेसचे २५ खासदार आहेत आणि पक्षाचे चार सदस्य निवृत्त होत आहेत. मात्र योग्य रणनीती केल्यास काँग्रेसला दोन अतिरिक्त जागा मिळू शकतात. भाजप राज्यसभेच्या १०३ जागांवरून १०८-१०९ पर्यंत पोहचू शकतो.
अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून मिळालेल्या वृत्तानुसार, सध्याची परिस्थिती पाहता अभिषेक मनु सिंघवी यांना तेलंगणामधून पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला छत्तीसगडमध्येही एक जागा मिळण्याची शक्यता आहे आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव चर्चेत आहे.
हिमाचल प्रदेश व हरियाणामध्येही काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार आहे व हरयाणामध्ये त्यांचे ३७ आमदार आहेत.
आसाममध्येही संधी?
आसाममध्ये काँग्रेसकडे २९ मते असून एका जागेसाठी ३२ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. सीपीएम (१), एआययूडीएफ (१६) आणि बीपीएफ (१) यांचा पाठिंबा मिळाल्यास काँग्रेसला येथेही संधी मिळू शकते. मात्र मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाजप ३ जागा जिंकेल असा दावा केला.
ओडिशामध्ये नवीन पटनायक यांच्या बीजेडीशी समन्वय झाल्यास काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. बीजेडीकडे ५१ मते असून एका उमेदवाराला विजयासाठी ३० मतांची गरज असते. काँग्रेसकडे येथे १४ आमदार आहेत.
काँग्रेसमधून हे नेतेही इच्छुक
केंद्रीय मंत्री आनंद शर्मा आणि भंवर जितेंद्र सिंह, चित्रपट अभिनेते राज बब्बर, पवन खेरा, सचिन राव, कृष्णा अल्लावरू, मीनाक्षी नटराजन, सुप्रिया श्रीनाते आणि इतर राज्यसभेच्या जागांवर इच्छुक आहेत.
बंडखोरांचा पाठिंबा
तेलंगणात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस नेतृत्वाला अतिरिक्त जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. यूपीएकडे ६५ आमदार आहेत आणि एमआयएम (७) तसेच बंडखोर बीआरएस आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो.
तामिळनाडूमध्ये काँग्रेसने द्रमुककडे राज्यसभेची एक जागा देण्याची विनंती केली आहे. मात्र मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन सत्ता वाटप करत नसल्याने शक्यता कमी मानली जात आहे.
Web Summary : Congress eyes Rajya Sabha gains in upcoming elections. Despite four retirements, strategic alliances could secure up to six seats. Focus on Chhattisgarh, Himachal, Haryana, and potential support in Assam and Odisha offers opportunities for expansion.
Web Summary : आगामी राज्यसभा चुनावों में कांग्रेस को लाभ की उम्मीद है। चार सदस्यों के सेवानिवृत्त होने के बावजूद, रणनीतिक गठबंधन से छह सीटें मिल सकती हैं। छत्तीसगढ़, हिमाचल, हरियाणा पर ध्यान केंद्रित करने से असम और ओडिशा में समर्थन मिल सकता है।