शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शिक्षणाच्या खर्चात गुजरात देशात 26व्या स्थानावर का?, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 10:13 IST

'22 वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या', असे ट्विट करुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींकडून दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले जात आहेत.

नवी दिल्ली - '22 वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या', असे ट्विट करुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींकडून दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले जात आहेत. शनिवारी राहुल गांधी यांनी गुजरातमधील सरकारी शाळा व कॉलेजसंबंधी टीका करत मोदींना प्रश्न विचारला आहे.  ''22 सालों का हिसाब#गुजरात_मांगे_जवाबप्रधानमंत्रीजी- चौथा सवालसरकारी स्कूल-कॉलेज की कीमत पर  किया शिक्षा का व्यापारमहँगी फ़ीस से पड़ी हर छात्र पर मारNew India का सपना कैसे होगा साकार?सरकारी शिक्षा पर खर्च में गुजरात देश में 26वें स्थान पर क्यों? युवाओं ने क्या गलती की है?'', असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.  सरकारी शिक्षण संस्थांवर होणा-या खर्चा गुजरात देशात 26 व्या स्थानावर का आहे, असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

 

यापूर्वी, राहुल गांधी यांनी, सरकारी वीज निर्मिती प्रकल्पांमधील निर्मिती कमी करुन 4 खासगी कंपन्यांचे खिसे का भरले?, असा सवाल विचारला होता. जनतेच्या पैशांची मोदींनी लूट का केली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दररोज पंतप्रधान मोदींना गुजरातमधील परिस्थितीबद्दल प्रश्न विचारत आहेत.

‘2002-16 या काळात 62 हजार 549 कोटी रुपयांची वीज खरेदी करुन 4 खासगी कंपन्यांचे खिसे का भरण्यात आले? सरकारकडून केली जाणारी वीज निर्मिती क्षमता 62 टक्क्यांनी कमी करुन 3 रुपये प्रति युनिट दराने मिळणारी वीज खासगी कंपन्यांकडून 24 रुपये दराने का खरेदी करण्यात आली?,’ असे प्रश्न राहुल गांधींनी ट्विटरवरुन विचारले आहेत. जनतेच्या कमाईची लूट का करण्यात आली? असा सवालदेखील राहुल गांधींनी या ट्विटमधून उपस्थित केला. राहुल गांधी 29 नोव्हेंबरपासून दररोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. राहुल यांनी मोदींना सर्वप्रथम घरांच्या आश्वासनाबद्दल प्रश्न विचारला होता.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा