उत्तराखंडमध्ये काँग्रेसच

By admin | Published: May 11, 2016 04:27 AM2016-05-11T04:27:31+5:302016-05-11T04:27:31+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली असून, केंद्रातील मोदी सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे मानले जाते

Congress in Uttarakhand | उत्तराखंडमध्ये काँग्रेसच

उत्तराखंडमध्ये काँग्रेसच

Next

डेहराडून : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षा काँग्रेसचे हरीश रावत यांच्या नेतृत्वातील सरकारने जिंकली असून, केंद्रातील मोदी सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे मानले जाते. मात्र विधानसभेच्या कामकाजासंबंधीचा गोपनीय अहवाल सादर झाल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालय निकालाची अधिकृत घोषणा करणार आहे.
निकाल अधिकृतपणे जाहीर झाला नसला तरी हरीश रावत यांच्या बाजूने ३३ तर भाजपाच्या बाजूने २८ मते मिळाली. मतदानाच्या आधी काँग्रेसच्या रेखा आर्य भाजपाच्या गटात दाखल झाल्या, तर भाजपाने निलंबित केलेले बंडखोर आ. भीमलाल आर्य काँग्रेसच्या कळपात गेले. बसपा तसेच अन्य चार सदस्यांनी रावत यांच्या बाजूनेच मतदान केले. काँग्रेसचे २७ व हे ६ मिळून ३३ हा जादुई आकडा मिळवण्यात रावत सरकार यशस्वी ठरले.
उत्तराखंड विधानसभेत सकाळी ११ वाजता शक्तिपरीक्षेसाठीचे कामकाज सुरू झाले आणि दीड तासात ते संपले. या काळात विधान भवनासमोर काँग्रेस व भाजपाचे कार्यकर्ते तसेच पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामनची प्रचंड गर्दी झाली होती.
आतमध्ये आमदार, विधान भवन कर्मचारी व अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि प्रधान सचिव व त्यांचे कर्मचारी यांच्याखेरीज कोणालाही प्रवेश नव्हता. विधान भवनात मोबाइल नेण्यावरही बंदी घालण्यात आली होती.
>कडक बंदोबस्तात असे झाले मतदान..!
सरकारच्या बाजूने एकूण ३३ मते. काँग्रेस-२७, पीडीएफ-६ (त्यात बसपाचे २, यूकेडी-१ आणि ३ अपक्ष आमदारांचा समावेश), भाजपा-२८, भाजपाचे भीमलाल आर्य आणि काँग्रेसच्या रेखा आर्य यांनी क्रॉसव्होटिंग केल्याचा दावा काँग्रेसच्या आमदार सरिता आर्य यांनी केला आहे.
संपूर्ण विधान भवनाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. चोख सुरक्षा बंदोबस्तात मतदान सुमारे तासभर चालले. पत्रकार, विधिमंडळ कर्मचाऱ्यांनाही आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. मतदानासाठी अवघ्या दोन तासांपुरती राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली होती.
>लोकशाही, जनतेचा विजय - काँग्रेस
हा लोकशाही, देशाचे संविधान आणि राज्यातील जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे. शक्तिपरीक्षा अतिशय शिस्तबद्ध, शांत आणि घटनात्मक पद्धतीने पार पडली आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालय काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा निर्णय देईल तेव्हा या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय ‘सत्तेची मगरुरी’ असल्याचे सिद्ध होईल, असेही ते म्हणाले.
>उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेच्या निष्पत्तीबाबत भाष्य टाळत रावत यांनी
केंद्र सरकारला संघर्षाचे राजकारण संपवून राज्याच्या विकासासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. ६८ वर्षीय रावत यांनी शक्तिपरीक्षा आटोपताच प्रदेश कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रत्येक आमदाराचा नामोल्लेख करीत आभार मानले.

Web Title: Congress in Uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.