शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून मोदींच्या जातीचा ओबीसीत समावेश : अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 08:42 IST

मोदींच्या जातीचा २५ जुलै १९९४ रोजी गुजरातमध्ये ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीवरून वादविवाद होतोय हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीररीत्या खोटे बोलण्याची सवय असल्याचा आरोप केला. गुजरातमधील काँग्रेस सरकारने १९९४ मध्ये, तर केंद्राने २००० मध्ये मोदींच्या जातीचा समावेश इतर मागासवर्गीय (ओबीसी) श्रेणीत केला. तेव्हा मोदींकडे कोणतेही पद नव्हते, असे त्यांनी शनिवारी एका कार्यक्रमात सांगितले. 

शाह म्हणाले की, मोदींच्या जातीचा २५ जुलै १९९४ रोजी गुजरातमध्ये ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला. तोपर्यंत मोदींनी एकही निवडणूक लढवली नव्हती. यानंतर गुजरात सरकारने त्यांची जात केंद्रीय ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. अखेर २००० मध्ये केंद्रीय ओबीसी यादीत त्यांच्या जातीचा समावेश करण्यात आला. तेव्हाही मोदींकडे सत्तेचे कोणतेही पद नव्हते. ना ते खासदार होते, ना आमदार होते, ना सरपंच होते.

‘रामाशिवाय भारताची कल्पनाच नाही’ ‘रामाशिवाय भारताची कल्पनाच करता येत नाही. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचा अभिषेक होण्याचा दिवस भारताला ‘विश्वगुरु’ बनण्याच्या मार्गावर आणेल’. शनिवारी लोकसभेत नियम १९३ अन्वये ऐतिहासिक श्रीराम मंदिराचे बांधकाम आणि श्रीरामलल्ला यांचा अभिषेक या विषयावरील चर्चेत भाग घेताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, २२ जानेवारीचा दिवस इतिहासात १० हजार वर्ष स्मरणात राहील. 

‘आज मला माझ्या भावना आणि जनतेचा आवाज इथे मांडायचा आहे. ज्या भावना न्यायालयीन कागदपत्रांमध्ये दफन झाल्या होत्या. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याला आवाज आणि अभिव्यक्ती मिळाली, असे ते म्हणाले. सभागृहात आलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावांपैकी एक म्हणजे राम जन्मभूमीशी संबंधित प्रस्ताव आहे’. २२ जानेवारीचा दिवस येणाऱ्या हजारो वर्षांसाठी ऐतिहासिक ठरला आहे, असे गृहमंत्री म्हणाले, 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस