शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य; भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 05:51 IST

देशाच्या हृदयस्थानी असलेले मध्यप्रदेश हे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश व महाराष्ट्राप्रमाणेच महत्त्वाचे राज्य आहे. एके काळी मध्यप्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाई. असे; पण येथेही अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत गेली.

- प्रसाद कुलकर्णीदेशाच्या हृदयस्थानी असलेले मध्यप्रदेश हे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश व महाराष्ट्राप्रमाणेच महत्त्वाचे राज्य आहे. एके काळी मध्यप्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाई. असे; पण येथेही अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत गेली.मध्य प्रदेशात लोकसभेचे २९ लोकसभा मतदारसंघ आहेत. गेल्या लोकसभा निवडणकुीत मोदी लाटेत भाजपाने त्यापैकी तब्बल २७ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला २ जागाच मिळाल्या. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदी लाटही राज्यात राहिलेली नाही आणि मतदारही पर्यायाच्या शोधात आहेत. त्याचे द्योतक म्हणजे हल्लीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका. सुमारे पंधरा वर्षे येथे भाजपाची सत्ता होती. पण यंदा २३० पैकी ११४ जागांवर मुसंडी मारून काँग्रेसने पुनरागमन केले. भाजपानेही जोरदार लढत देत १०९ जागा मिळवल्या आणि अन्यांना ७ जागा मिळाल्या. राहुल गांधी यांच्या प्रचाराची छाप निवडणूक निकालांवर स्पष्ट दिसून आली.राज्यातील पराभवाने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यापुढे कायमच देशात भाजपाची सत्ता राहणार आहे नि देश सतत मोदींच्या भाषणांना भुलणार आहे, अशा दिवास्वप्नात राहणाऱ्या भाजपाची धुंदी या निकालांनी खाडकन उतरली. खडबडून जाग आलेला भाजपाही आता तयारीला लागला असून राज्याचे प्रभारी स्वतंत्रदेव सिंह व सहप्रभारी सतीश उपाध्याय यांनी भाजपाच्या खासदारांचा साडेचार वर्षांचा लेखाजोखा तयार केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांत जनतेचा कौल मिळूनही चांगले काम करण्याची संधी काही जणांनी सत्तेच्या उन्मादात दवडली. भाजपाचच्या २७ पैकी १० खासदारांची कामगिरी अतिशय वाईट असल्याचा अहवाल प्रभारींनी श्रेष्ठींना पाठविला आहे. हे उमेदवार पुन्हा उभे राहिले तर नक्कीच आपटणार; याचा अंदाज प्रभारींना स्पष्टपणे आला. त्यामुळे त्या १0 जणांचा पत्ता ‘कट’ होणे निश्चित मानले जात आहे. याचा फायदा विधानसभेत पराभूत झालेल्या भाजपच्या काही नेत्यांना होण्याची शक्यता आहे. अनेक नेते यामुळे मनात गाजरे खात आहेत. मध्यंतरी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे विधानसभेत हरलेल्या सहा मंत्र्यांना आता लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाने २९ जागांना आता १० प्रभागांत विभागले असून पद्धतशीरपणे प्रचार यंत्रणा राबविण्याची तयारी चालवली आहे.दुसरीकडे विधानसभेतील यशामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे. लोकसभेच्या २९ पैकी किमान २० ते २२ जागा जिंकण्याची उमेद काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळगून आहेत. धार, खरगोन, मंडला, शाहडोल, रतलाम- झाबूआ, बैतूल या जागांवर काँग्रेस विशेष जोर देत आहे. हा सर्व आदिवासी पट्टा आहे. या परिसरातील ४७ पैकी ३१ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसने विजय मिळवला आहे. सध्या या भागात केवळ रतलाममध्येच काँग्रेसचा खासदार आहे.छिंदवाडा ही जागा काँग्रेसची परंपरागत जागा मानली जाते. गुनामध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे तगडे उमेदवार काँग़्रेसकडे आहेत. धार आणिमंडला लोकसभा मतदारसंघांतील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला विजय मिळाला. बैतूलमध्ये भाजपा व काँग्रेसचे समसमान बल आहे. यामुळे येथे चुरशीची लढत होऊ शकते. शाहडोलमध्येही हीच परिस्थिती आहे, कारण बैतूल व शाहडोल या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत या दोन्ही पक्षांचे आठपैकी प्रत्येकी चार आमदार आहेत. बालाघाटमध्ये आठपैकी सहा आमदार काँग्रेसचे आहेत. विधानसभेतील हे यश पुन्हा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. खरगोन, ग्वाल्हेर व मुरैनामध्ये तर आठपैकी सात आमदार काँग्रेसचे आहेत. भिंडमध्ये काँग्रेसचे पाच आमदार आहेत.मलासुद्धा खासदार व्हायचंय!अद्याप नावांच्या प्राथमिक याद्यांवरच चर्चा होत आहे; पण हौशे, नवशे, गवशे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या मागे फिरून ‘लोणी लावणेही’ सुरू आहे. आपल्या मागे जनमत व कार्यकर्त्यांची फौज आहे, असे भासविण्याचा काही जणांचा आटापिटाही सुरू आहे; पण फारच कमी जागा अशा आहेत की, जेथे या प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. बाकी घोडामैदानाला काहीसा वेळ आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश