शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रवक्त्या डॉली शर्मा यांच्याविरोधात एफआयआर, सासूच्या घरावर कब्जा केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 11:19 IST

डॉली शर्मा यांच्याशिवाय अन्य २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस प्रवक्त्या डॉली शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉली शर्मा यांच्यावर आपल्या सासूचे घर कब्जा केल्याचा आरोप आहे. डॉली शर्मा यांच्या सासू पुष्पा शर्मा यांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉली शर्मा यांच्याशिवाय अन्य २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉली शर्मा यांच्या सासूचे घर वैशाली, गाझियाबाद येथे आहे.

पुष्पा शर्मा यांनी ९ फेब्रुवारी रोजी पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार, डॉली शर्मा या त्यांचे लिंक रोडवरील घर हिसकावून घेऊ इच्छित आहेत. डॉली शर्मांच्या सासूने आपल्या सुनेवर जबरदस्तीने घरात घुसून आपल्या ताबा घेतल्याचा आरोप केला आहे. मात्र, डॉली शर्मा यांनी जबरदस्तीने घरात घुसल्याचा आरोप फेटाळून लावला असून ही कौटुंबिक बाब असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७८ वर्षीय पुष्पा शर्मा यांनी डॉली शर्मा यांच्यावर गार्डला बंदुकीचा धाक दाखवून घरात घुसल्याचा आरोप केला आहे. तसेच, सासूने सांगितले की, ९ फेब्रुवारीला डॉली शर्मा आणि इतर २० लोक घरात घुसले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत डॉली शर्मा यांनी सासूकडून घराच्या चाव्या हिसकावून तिला फेकून दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, डॉली शर्मा यांच्या सासूनेही यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. 

न्यायालयाने दिला होता 'हा' आदेश पुष्पा शर्मा यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारीला गाझियाबाद सत्र न्यायालयाने डॉली शर्मा आणि पती दीपक शर्मा यांना परवानगीशिवाय घरात प्रवेश करू नये, असे सांगितले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉली शर्मा यांनी घरात घुसून मला माझ्याच मालमत्तेतून बेदखल केले. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेस