शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

49 महिन्यांमध्ये स्विस बँकेतील काळा पैसा पांढरा झाला का?; काँग्रेसचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 15:54 IST

अर्थमंत्री अरुण जेटलींच्या विधानाचा समाचार 

नवी दिल्ली: स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. मोदी पंतप्रधान होण्याआधी जो पैसा काळा होता, तो 49 महिन्यांमध्ये पांढरा झाला, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. 'मे 2014 च्या आधी स्विस बँकेतील पैसा काळा होता. मोदी सरकारच्या 49 महिन्यांच्या सत्ताकाळात मात्र हा पैसा पांढरा झाला आहे,' असं ट्विट करत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशात वाढ झाल्याचं वृत्त येताच मोदी सरकारमधील दोन वरिष्ठ मंत्री सरकारच्या बचावासाठी पुढे आले. यावरुनही सुरजेवाला यांनी सरकारवर शरसंधान साधलं. 'एकाचवेळी दोन अर्थमंत्री (?) स्विस बँकेतील खातेधारकांच्या बचावासाठी पुढे आले. हा पैसा बेकायदा नसल्याचं दोघेही मंत्री सांगत आहेत,' असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

स्विस बँकेतील सर्व पैसा काळा नसल्याचं म्हणत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारचा बचाव केला होता. या विधानाचाही सुरजेवाला यांनी समाचार घेतला. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांच्या खात्यातील रकमेत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे स्विस बँकेतून काळा पैसा भारतात आणू म्हणणाऱ्या सरकारनं देशातील काळा पैसा भारताबाहेर घालवला, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीblack moneyब्लॅक मनीSwiss Bankस्विस बँकcongressकाँग्रेसBJPभाजपाArun Jaitleyअरूण जेटली