शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या 'त्या' खराब कामगिरीवर संजय राऊत रोखठोक बोलले; महाविकास आघाडी सरकारमध्ये ठिणगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 13:42 IST

ShivSena MP Sanjay Raut on congress performance in gujarat municipal election: संजय राऊतांच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता

मुंबई: गुजरातमधील महापालिका निवडणुकांमध्ये (Gujarat Municipal Election Results 2021) भारतीय जनता पक्षानं (BJP) शानदार विजय मिळवला. भाजपनं सहापैकी सहा महापालिका आपल्याकडे कायम राखल्या आहेत. एकूण ५७५ पैकी ४८३ जागा जिंकत भाजपनं महापालिका निवडणुकीत आपला करिश्मा दाखवून दिला. विशेष म्हणजे आम आदमी पक्षानं निवडणुकीत चांगलं यश मिळवलं. मात्र काँग्रेसची (Congress) कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे.गुजरातमध्ये भाजप सुस्साट, 'आप'ची एन्ट्री ठरली काँग्रेससाठी ताप; MIM कडे मतदारांची पाठकाँग्रेस पक्षाची अवस्था अशी का, याचा विचार पक्षानं करायला हवा. गुजरातच्या जनतेनं आपल्याला का नाकारलं याबद्दल काँग्रेसनं मंथन करायला हवं, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. 'सूरत एक महत्त्वाची महापालिका आहे. तिथे आम आदमी पक्ष विरोधी पक्षात बसेल. गुजरातमध्ये आपनं प्रवेश केला आहे आणि एका महत्त्वाच्या पालिकेत त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे. याचा विचार काँग्रेसनं करायला हवा,' असं राऊत म्हणाले.सुरतमध्ये काँग्रेसला भोपळा, केजरीवालांचा 'आप' ठरला प्रमुख विरोधी पक्ष'गुजरातमधील कामगिरीचा विचार काँग्रेस पक्षाला करावा लागेल. आम्हा सगळ्यांना करावा लागेल. आपला चांगलं यश मिळालं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला जनतेनं नाकारलं आहे. गुजरात असो वा इतर राज्यं, काँग्रेसला अपेक्षित मिळताना दिसत नाही. काँग्रेसचं याप्रकारे होणारं पतन लोकशाहीसाठी योग्य नाही,' असं राऊत यांनी म्हटलं.काँग्रेसला धक्का; आप, एमआयएमचा गुजरातमध्ये प्रवेशमहापालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला असताना आप आणि एमआयएमला चांगलं यश मिळालं आहे. भाजपनं अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगरमधील सत्ता कायम राखली आहे. सहा महापालिकांमध्ये मिळून काँग्रेसला केवळ ५५ जागा जिंकता आल्या. सूरतमध्ये तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही. तर आपनं २७ जागा जिंकल्या. त्यामुळे आप सूरत महापालिकेत विरोधी पक्ष असेल.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसGujaratगुजरातBJPभाजपा