शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या महिला आमदाराने व्हीप झुगारला; सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:00 IST

काँग्रेसने पक्षाचा व्हीप झुगारणाऱ्या महिला आमदाराविरोधात सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

लखनऊ: उत्तपप्रदेशच्या विधानसभेमध्ये काँग्रेसने पक्षाचा व्हीप झुगारणाऱ्या महिला आमदाराविरोधात सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. ही महिला आमदार खुद्द सोनिया गांधी यांच्याच राय बरेली मतदारसंघातील आहे. यामुळे या घटनेला महत्व प्राप्त झाले आहे. 

राय बरेलीमधून आदिती सिंह या आमदार झाल्या आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दिक्षीत यांच्याकडे मंगळवारी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेत्या आराधना मिश्रा यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. 

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आदिती सिंह यांना पक्षाने विशेष अधिवेशनामध्ये उपस्थित न राहण्याचा व्हीप बजावला होता. मात्र, त्या 2 ऑक्टोबरला हजर राहिल्या. भाजपा सरकारने महात्मा गांधींच्या जयंतीनिमितत्त हे अधिवेशन बोलावले होते. तसेच त्यांना याबाबत कारणे दाखवा नोटिसही बजावली होती. मात्र, त्यांचे उत्तर आलेले नाही. यामुळे कायद्यातील कलम 10 तरतुदीनुसार आदिती यांचे सदस्यत्व रद्द करावे. 

काँग्रेसने रविवारीच पक्षाची बदनामी करत असल्याच्या कारणावरून 10 नेत्यांना पक्षातून काढून टाकले आहे. लोकसभा  निवडणुकीवेऴी आदिती सिंह यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला झाला होता. जिल्हा पंचायत प्रमुख अवधेश सिंह यांनी हल्ला केल्याचा आरोप आदिती सिंह यांनी केला होता. गांधी कुटुंबाच्या जवळच्या असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अदिती सिंह यांचे नुकतेच लग्नही झाले आहे. 

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश