शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे फेसबुकवर पुन्हा टीकास्त्र : झुकेरबर्ग यांना लिहिले दुसरे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 04:23 IST

भाजप व फेसबुक यांच्या जवळिकीबाबत काँग्रेस आक्रमक; हा तर लोकांशी धोका

- शीलेश शर्मानवी दिल्ली : भाजप व फेसबुक यांच्यातील जवळिकीबाबत काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्ष सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी फेसबुकचे चेअरमन मार्क झुकेरबर्ग यांना महिन्यात दुसरे पत्र लिहून वॉल स्ट्रीटनंतर आता टाईम मॅगझीनचा हवाला देऊन आरोप केला आहे की, फेसबुक व व्हॉटस्अ‍ॅप भारतात सत्तारूढ भाजपच्या राजकीय हितांचे संरक्षण करीत आहे व या दोन्ही सोशल मीडियावर भाजपचेच नियंत्रण आहे.वेणुगोपाल यांनी पत्रात म्हटले आहे की, आपल्या संस्थेतील अनेक लोक भाजपला मिळालेले आहेत. देशातील ४० कोटींपेक्षा अधिक लोक व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करीत असून, त्यांना आपल्या संस्थेचे लोक भाजप हितांसाठी प्रभावित करीत आहेत. कोणत्याही विदेशी कंपनीने सोशल मीडियाचा दुरुपयोग करू नये, यासाठी कायदेशीर इलाज करील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.पक्ष प्रवक्ते पवन खेडा यांनी मागील दहा दिवसांत घडलेल्या घडामोडींचा उल्लेख करून म्हटले आहे की, विदेशी वृत्तपत्रे व नियतकालिकांत याबाबत मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर हा मुद्दा आंतरराष्टÑीय स्तरावर गेला आहे. त्यांनी अंकिता दास यांच्यानंतर आता शिव नाथ ठुकराल यांच्यावर आरोप केला आहे की, टाईम मॅगझिननुसार, त्यांचे भाजपशी लागेबांधे आहेत.२०१४ च्या निवडणुकीनंतर मोदी यांनी जी टीम तयार केली होती, त्यात ठुकराल यांची भूमिका होती. अलेक्स स्टामॉस यांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, जेव्हा नियुक्त्या सत्ताधारी पक्षाच्या हस्तक्षेपातून होतील, तेव्हा अशा प्रकारचे झुकते माप देणे स्वाभाविक आहे.पवन खेडा यांनी म्हटले आहे की, फेसबुक व व्हॉटस्अ‍ॅप जे काही भारतात करीत आहे, ती १३० कोटी भारतीयांशी धोकेबाजी आहे. फेसबुक लोकांचा डाटा भाजपला उपलब्ध करून देत आहे. अखेर हे सर्व कोणाच्या दबावातून सुरू आहे, असा सवालही त्यांनी केला.राहुल गांधी यांचे टीकास्त्रकाँग्रेस व फेसबुकच्या लढाईत राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी टष्ट्वीटद्वारे म्हटले आहे की, अमेरिकी टाईम मॅगझिनने व्हॉटस्अ‍ॅप व भाजपच्या संबंधांचा पर्दाफाश केला. ४० कोटी भारतीय व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करतात व आता त्यावरून पैशाचे व्यवहार व्हावेत, असे व्हॉटस्अ‍ॅपला वाटतेय. त्यासाठी मोदी सरकारची स्वीकृती गरजेची आहे. यासाठी भाजपची व्हॉटस्अ‍ॅपवर पकड आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसFacebookफेसबुकBJPभाजपा