शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

"हिंसाचार, जिवितहानी होऊनही...!" एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 22:49 IST

...आता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी इंफाळ राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकजे आपला राजीनामा सादर केला. तत्पूर्वी एन. बिरेन सिंह यांनी आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

काय म्हणाले राहुल गांधी -यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "साधारणपणे दोन वर्षांपर्यंत भाजपचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी मणिपूरमध्ये फूट पाडली. मणिपूरमध्ये हिंसाचार, जिवितहानी आणि भारताच्या विचारांचा नाश होऊनही पंतप्रधान मोदींनी त्यांना हटवले नाही. एन बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यावरून स्पष्ट होते की, लोकांचा वाढता दबाव, सुप्रीम कोर्टाकडून चौकशी आणि काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाने त्यांना असे करायला भाग पाडले. मात्र, सर्वात महत्वाचे काम, राज्यात शांतता प्रस्थापित करणे आणि मणिपूरच्या लोकांचे घाव भरून काढणे आहे."

"पंतप्रधानांनी तातडीने मणिपूरचा दौरा करावा" -काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी तातडीने मणिपूरला भेट द्यायला हवी, लोकांचे म्हणणे ऐकायला हवे आणि तेथील परिस्थिती कशीपद्धतीने सामान्य होईल यासंदर्भात सरकारची योजना सांगायला हवी." तसेच, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, "उद्या, काँग्रेस पक्ष मणिपूर विधानसभेत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होता. मात्र, वातावरण ओळखून मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला."

मणिपूरमध्ये 2 वर्षे हिंसाचार सुरू मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. राज्यातील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वाढत्या तणावामुळे अनेक हिंसक चकमकी झाल्या, परिणामी शेकडो लोकांनी प्राण गमावले आणि हजारो लोकांना घर सोडावे लागले. जमीन, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व याबाबत मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये दीर्घकाळापासून वाद आहे. दरम्यान, राज्यातील सरकार पक्षपाती असल्याचा आरोप एका समुदायाकडून केला जात आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात मोठ्या प्रमाणावर चकमकी झाल्या. केंद्र सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तेथे अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात केले आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी