शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"दिवाळीत महागाई शिगेला, मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:12 IST

Congress Rahul Gandhi slams Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - वाढत्या महागाईविरोधात विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सद्य:स्थितीत देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली असून, प्रमुख शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपये प्रतिलीटरपेक्षा जास्त झाला आहे. त्यातही काही शहरांमध्ये पेट्रोलची 110 रुपये अधिक दराने विक्री होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी बुधवारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दिवाळीच्या काळात महागाई शिगेला पोहोचली आहे म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे. "आज दिवाळी आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. हा विनोद नाही. मोदी सरकारकडे जनतेसाठी संवेदनशील हृदय असावं अशी इच्छा आहे" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्र सरकार जोरदार हल्लाबोल करत आहेत. याच दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून ही महागाई दिली आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून दिली महागाई"; इंधन दरवाढीवरून जोरदार हल्लाबोल

"देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीत विक्रमी वाढ केल्याबद्दल कायम स्मरणात राहील. नरेंद्र मोदी सरकारने जनतेला दिवाळी भेट म्हणून महागाई दिल्याचे दिसते" असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. तसेच "पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यतेल आणि भाज्यांच्या किमती ज्या प्रकारे वाढत आहेत, ते पाहता मोदी सरकारने जनतेला महागाईची दिवाळी भेट दिली आहे. आधीची सरकारे सणांच्या आधी महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत असत, जेणेकरून सर्वसामान्यांना सण आनंदाने साजरा करता यावा" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "दिवाळीच्या फक्त तीन दिवस आधी, मोदी सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती 266 रुपयांनी वाढवून मिठाई महाग करण्याची व्यवस्था केली आहे. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 116 रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर 108 रुपये झाले आहेत, तर घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर एका वर्षात 598 रुपयांवरून 305 रुपयांनी वाढले असून 903 रुपयांपर्यंत गेले आहेत" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "आमच्या सरकारने गुणवंत विद्यार्थिनींना महाविद्यालयात जाण्यासाठी स्कूटीचे वाटप केले, पण मुली मोदी सरकारला विचारत आहेत की एवढे महाग पेट्रोल कसे विकत घ्यायचे?" असंही गेहलोत म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसFuel Hikeइंधन दरवाढ