शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

“आज नाही तर उद्या सत्याचा विजय हा होतोच; माझा मार्ग मोकळा झाला, आता पुढे...”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 18:13 IST

Rahul Gandhi Press Conference: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Rahul Gandhi Press Conference: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकीही परत मिळणार आहे. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले.

या पत्रकार परिषदेत अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश यांच्यासह अन्य काही जण उपस्थित होते. आनंदाचा दिवस आहे. सत्यमेव जयते. सत्याचा विजय झाला. लोकशाहीचा विजय झाला. हा केवळ राहुल गांधी यांचा विजय नाही, तर देशातील जनतेचा विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. संविधान अजून जिवंत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. न्याय मिळू शकतो. हा सामान्य माणसाचाही विजय आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करायला किती वेळ लागतो ते पाहू

जो सत्यासाठी लढतो, देशाच्या ताकदीसाठी लढतो, तरुणांसाठी बोलतो, महागाईशी लढतो. लोकांना जागरुक करण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधी फिरले. गरीब, मुले, डॉक्टर आणि इंजिनियर यांना भेटले. त्या सगळ्यांच्या प्रार्थना आमच्या पाठीशी  होत्या. हा जनतेचा विजय आहे, असे सांगताना, राहुल गांधी यांचे सदस्यत्व २४ तासांत रद्द ठरवले. २४ तासांत सगळी सूत्रे हलली. आता राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यासाठी किती वेळ लागतो, ते पाहू. आम्ही वाट पाहू, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.

पुढे काय करायचे याबाबत माझे विचार स्पष्ट आहेत

राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा सत्याचा विजय होतो. माझा मार्ग मोकळा आहे. माझे काम काय आहे, मला पुढे काय करायचे आहे, याबाबत माझे विचार स्पष्ट आहेत. ज्या ज्यो लोकांनी सहकार्य केले, त्यांना खूप खूप धन्यवाद, अशा मोजक्या शब्दांत राहुल गांधी यांनी भाष्य केले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे