शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल..."; राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 14:21 IST

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार आणि यूपीतील योगींच्या भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी "डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका"असं म्हटलं आहे. तसेच त्यांची न्याय यात्रा शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली. 

राहुल यांनी आपल्या ट्वि़टर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारी नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. जिथे दीड लाखांहून अधिक सरकारी पदं रिक्त आहेत, तिथे पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारक किमान पात्रता असलेले लोक रांगेत उभे आहेत. पहिलं म्हणजे भरती निघणं हे स्वप्नच असतं."

"भरती निघाली तर पेपर फुटतो, पेपर दिला तर निकाल कळत नाही आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही निकाल लागतो, अनेकदा रुजू होण्यासाठी न्यायालयात जावे लागते. लष्करापासून रेल्वेपर्यंत आणि शिक्षणापासून पोलिसांपर्यंत भरतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर लाखो विद्यार्थी ओव्हरएज झाले आहेत."

"निराशेच्या या चक्रव्यूहात अडकलेला विद्यार्थी डिप्रेशनला बळी पडत आहे आणि खचून जात आहे. या सगळ्यामुळे व्यथित होऊन जेव्हा तो आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला पोलिसांच्या लाठीमार करण्यात येतो. विद्यार्थ्यासाठी नोकरी हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्याच्या कुटुंबाचे जीवन बदलण्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न भंगल्याने संपूर्ण कुटुंब निराश होतं" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणUnemploymentबेरोजगारी