शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020 : "शेतकरी शेतमाल विमानाने विकणार की रस्त्यावर आणि बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 16:53 IST

Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. मंगळवारी बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "शेतकरी शेतमाल विमानाने विकणार की रस्त्यावर आणि बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?" असं म्हणत मोदींना टोला लगावला आहे. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, आम्ही आणलेल्या कायद्यांमुळे शेतकरी त्याचा शेतमाल देशात कुठेही जाऊन विकू शकतो. मला नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावं की शेतकरी विमानाने त्याचा शेतमाल विकण्यासाठी जाईल की रस्त्यावर शेतमाल विकेल? रस्त्यावर शेतमाल विकायचा असेल तर बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत?" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सभेमध्ये त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

राहुल गांधी यांनी मंगळवारी किशनगंजमध्ये जाहीर सभा घेतली. राहुल यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बिहारची लूट सुरू केली आहे. बिहारमधील शेतकरी, कामगार, छोट्या दुकानदारांना संपवलं आहे. यामुळे बिहारच्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आता महाआघाडीला विजयी करून बिहारमध्ये सत्ता बदलाचं काम करावं आहे" असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. 

"नवा कृषी कायदा खास लोकांसाठी, अंबानी, अदानींशी शेतकरी सौदा करू शकतील का?"

"छत्तीसगडमधील सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते आणि बिहार सरकार शेतकर्‍यांचे पैसे लाटते. पंतप्रधान मोदींनी एक नवीन कृषी कायदे केले. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. हे कायदे मोदींनी त्यांच्या काही मित्रांसाठी केले आहेत. अंबानी आणि अदानी यांच्याशी शेतकरी व्यवहार करू शकतील का? एक गुजरातमध्ये, एक मुंबईत आणि तुम्ही बिहारमध्ये. छत्तीसगडप्रमाणे बिहारमधील शेतकऱ्यांनाही थेट खात्यात 2500 रुपये मिळावेत, असा आमचा विचार आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक