Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 09:33 AM2020-11-04T09:33:22+5:302020-11-04T09:43:45+5:30

Bihar Election 2020 And Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Bihar Election 2020 Congress rahul gandhi addresses public rally in kishanganj | Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

Bihar Election 2020 : "भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

Next

नवी दिल्ली - बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी किशनगंजमध्ये जाहीर सभा घेतली. राहुल यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांनी एकत्र बिहारची लूट सुरू केली आहे. बिहारमधील शेतकरी, कामगार, छोट्या दुकानदारांना संपवलं आहे. यामुळे बिहारच्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी आता महाआघाडीला विजयी करून बिहारमध्ये सत्ता बदलाचं काम करावं आहे" असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे. 

"छत्तीसगडमधील सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते आणि बिहार सरकार शेतकर्‍यांचे पैसे लाटते. पंतप्रधान मोदींनी एक नवीन कृषी कायदे केले. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. हे कायदे मोदींनी त्यांच्या काही मित्रांसाठी केले आहेत. अंबानी आणि अदानी यांच्याशी शेतकरी व्यवहार करू शकतील का? एक गुजरातमध्ये, एक मुंबईत आणि तुम्ही बिहारमध्ये. छत्तीसगडप्रमाणे बिहारमधील शेतकऱ्यांनाही थेट खात्यात 2500 रुपये मिळावेत, असा आमचा विचार आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं"

राहुल गांधी यांनी "पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेतकरी आणि गरिबांवर सर्वाधिक हल्ला केला आहे. भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं आहे. भाजपाचा बी-टीम सतत द्वेष पसरवत आहे. यामुळे आम्ही भाजपाच्या ए आणि बी या दोन्ही टीमशी लढत आहोत" असं म्हटलं आहे. नितीश कुमार यांनी तरुणांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तरुणांनी त्यांना नोकरीबद्दल विचारल्यावर ते शिवीगाळ करतात. रोजगार उपलब्ध करण्यात अपयशी ठरलो असं नितीश कुमार यांनी म्हटलं पाहिजे. देशात ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तिथे शेतकरी, गरीब आणि रोजगार निर्मितीसाठी काम केलं जातं असंही ते म्हणाले. 

"जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते कुठे होते? "

"लॉकडाऊन दरम्यान तुम्ही अन्न-पाण्यावाचून रस्त्यावरून चालत आपल्या गावी निघाला होतात. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी तुम्हाला मदत केली नाही. काँग्रेस पक्षाने मजूर आणि कामगारांना आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. आणि आता ते तुमच्याकडे मत मागत आहेत. त्यांना कोणतीही लाज वाटत नाही. जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती तेव्हा ते कुठे होते? त्यावेळी ते भारतातील श्रीमंतांचे कर माफ करत होते" असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Bihar Election 2020 Congress rahul gandhi addresses public rally in kishanganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.