शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

EU शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारला घेरलं; सुब्रमण्यम स्वामींनीही दिला घरचा आहेर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 21:59 IST

विशेष म्हणजे, भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्र सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : युरोपियन युनियनचे शिष्टमंडळ उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जम्मू-काश्मीरला जाण्यासाठी युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाला परवानगी देण्यात आली. मात्र, विरोधकांना त्याठिकाणी जाण्याची परवानगी का देण्यात येत नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे. विशेष म्हणजे, भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्र सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेता जयराम रमेश यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "ज्यावेळी भारतीय नेत्यांना जम्मू-काश्मीरमधील लोकांची भेट घेण्यासाठी रोखले जात आहे. त्यावेळी छाती ठोकून राष्ट्रवाद सांगणाऱ्यांनी कोणता विचार करून युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाला जम्म-काश्मीरला जाण्यासाठी परवानगी दिली. हा तर सरळ-सरळ भारताच्या संसदेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे."

काँग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनीही युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर सवाल उपस्थित केला आहे.  जयवीर शेरगिल म्हणाले, "पहिली बाब म्हणजे, कोणत्याही देशाला किंवा त्यांच्या सदस्यांना किंवा कोणत्याही विदेशातील संसदेला जम्मू-काश्मीरमध्ये लक्ष घालण्याचा कोणताच अधिकार नाही. कारण, हा भारताचा आंतरिक मुद्दा आहे.  दुसरे म्हणजे, पीएमओकडून युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळासोबत मेजवानी करण्यात येते. त्यांना जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यासाठी व्यवस्था करण्यात येते. मग, हा शिष्टाचार विरोधकांसोबत का नाही? विरोधी नेत्यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याला केंद्र सरकार विरोध का करत आहे?"

दुसरीकडे, भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्र सरकारला या मुद्द्यावरून घेरले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, "मी आश्चर्यचकित झाले की, परराष्ट्र मंत्रालयाने युरोपियन युनियनचं शिष्टमंडळाच्या जम्मू-काश्मीरमधील खासगी दौऱ्यासाठी व्यवस्था केली आहे. हे आपल्या राष्ट्रीय पॉलिसीच्या विरोधात आहे. मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी हा दौरा रद्द करावा, कारण हा अनैतिक आहे." 

दरम्यान, युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबद्दल चर्चा झाली. युरोपियन युनियनचे शिष्टमंडळ उद्या जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळ या भागाला भेट देणार आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी