शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

काँग्रेसने देश संकटात टाकला; अर्थमंत्री सीतारामन यांनी काढले वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 09:39 IST

यूपीए सरकारच्या अर्थव्यवस्थेचे अर्थमंत्री सीतारामन यांनी काढले वाभाडे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  काँग्रेसने “कुटुंब प्रथम” धोरण ठेवून २०१४ मध्ये देशाला भीषण संकटात टाकले होते, परंतु आता तेच केंद्र सरकारला अर्थव्यवस्था हाताळण्यावर सल्ले देत आहे, असा हल्लाबोल करीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या अर्थव्यवस्थेच्या चुकीच्या व्यवस्थापनाचे वाभाडे काढले. 

लोकसभेत ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील श्वेतपत्रिका आणि त्याचा भारतातील लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम’ या विषयावरील चर्चेला सुरुवात करताना सीतारामन म्हणाल्या की, विद्यमान केंद्र सरकारने “राष्ट्र-प्रथम” ठेवले आणि आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात नाजूक पाच अर्थव्यवस्थांमधून आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांत नेली. भारत आता तिसरी सर्वांत मोठी जागतिक अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे.“जागतिक आर्थिक संकटाच्या काळात काँग्रेसने राष्ट्रहिताचे रक्षण करण्यासाठी काहीही केले नाही आणि घोटाळे होत राहिले. त्यांनी २०१४ मध्ये देशाला अत्यंत संकटात सोडले,” अशी टीका त्यांनी केली. 

हा तर राजकीय जाहीरनामा : काँग्रेसnकाँग्रेसने अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर सरकारने आणलेल्या ‘श्वेतपत्रिका’ला राजकीय जाहीरनामा असे संबोधले, तर काँग्रेस भ्रष्टाचारात अखंड बुडाला आहे, अशी टीका भाजपने केली.nकाँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी सांगितले की, यूपीएने देशाचा आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पाया मजबूत केला होता.

‘गुगल पे, फोन पे हे टिकिंग टाइम बॉम्ब’गुगल पे, फोन पे हे दोन कधीही फुटू शकणारे (टिकिंग) टाईमबॉम्ब आहेत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेवरील श्वेतपत्रिका या विषयावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी सांगितले की, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये (पीपीबीएल) जे काही घडले ते अत्यंत चिंताजनक आहे. हे सारे प्रकरण जवळजवळ मनी लॉन्ड्रिंगसारखेच आहे. गुगल पे, फोन पे हे दोन कधीही फुटू शकणारे टाईमबॉम्ब आहेत. भीम ॲपचा वापर फारसा होत नाही, तर गुगल प्ले आणि फोन फे ॲप्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. डिजिटल किंवा कॅशलेस इकॉनॉमीवर सरकार काय करत आहे?, असे सुळे म्हणाल्या.

‘डीप फेक’साठी येताहेत कठाेर नियमसोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणे किंवा ‘डीपफेक’ यांसारख्या समस्यांना कठोरपणे सामोरे जाण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची आणि सोशल मीडिया व्यासपीठांची जबाबदारी निश्चित करण्याची व्यवस्था केली जात आहे, जेणेकरून या समस्येवर अंकुश ठेवता येईल, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान वैष्णव यांनी सांगितले की, आज सोशल मीडिया आणि इंटरनेट हे जीवनाचा अत्यावश्यक भाग बनले आहेत आणि व्यावहारिकदृष्ट्या आपण अनेक बाबींवर त्यांच्यावर अवलंबून आहोत. परंतु, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणे किंवा ‘डीपफेक’ यासारखे मुद्दे धोकादायक आहेत. ते थांबवण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.

पर्यटनाला ‘प्रसाद’ मिळेनापर्यटन मंत्रालयाच्या ‘प्रसाद’ योजनेंतर्गत एकूण ४५ मंजूर प्रकल्प आहेत. त्यापैकी केवळ २० पूर्ण झाले आहेत, या योजनेची प्रगती खूपच मंद आहे, असे निरीक्षण एका संसदीय समितीने नोंदवले आहे. परदेशी आणि देशी पर्यटकांचे आगमन आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित इतर सर्व डेटा गोळा करण्यासाठी पर्यटन मंत्रालय स्वतःची यंत्रणा विकसित करू शकते.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसBJPभाजपा