शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

काँग्रेसची प्रचारयंत्रणा वाऱ्यावर?, राष्ट्रीय नेत्यांनी फिरविली महाराष्ट्राकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 00:23 IST

येत्या २१ आॅक्टोबरला होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसच्या आघाडीवर मात्र सर्वत्र शांतता दिसत आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा उडालेला असताना काँग्रेस पक्षाच्या एकाही राष्ट्रीय नेत्याची महाराष्ट्रात अद्याप जाहीरसभा झालेली नाही. यामुळे या राष्ट्रीय नेत्यांची ‘पायधूळ’ महाराष्ट्राच्या भूमीला केव्हा लागणार, असा संतप्त सवाल आता काँग्रेसचे कार्यकर्ते करू लागले आहेत.येत्या २१ आॅक्टोबरला होणाºया विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असताना काँग्रेसच्या आघाडीवर मात्र सर्वत्र शांतता दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र ढवळून काढत असताना काँग्रेसचे ‘रार्ष्ट्रीय’ नेते अद्यापही प्रचारासाठी उतरलेले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री प्रचारात उतरलेले असताना काँग्रेसचे मैदान मात्र सुनसान आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्याच मतदारसंघात अडकून पडलेले आहेत. काँग्रेसने ४० जणांची स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात अनेक राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, काँग्रेसचे निवडणूक समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे या राष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे. यापैकी एकाही नेत्यांची ‘पायधूळ’ अद्यापही महाराष्ट्राच्या भूमीला लागलेली नाही.गांधी परिवारावर मदारकाँग्रेसची सारी मदार गांधी परिवारावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व माजी अध्यक्ष राहुल गांधी या तिन्ही नेत्यांच्या येत्या १३ आॅक्टोबरपासून जाहीरसभा महाराष्ट्रात होणार आहेत. यात प्रियंका गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये उतरणार असल्याने अनेक उमेदवारांनी प्रियंका गांधी यांच्या जाहीरसभांची मागणी केली आहे. परंतु अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही. यासंदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019