जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी ! -- भाग १ नऊ वर्षे एकहाती धुरा का ? : मोहिते, मुळक, केदार गटात अनेक

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:08+5:302015-08-02T22:55:08+5:30

नागपूर : जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत. गावंडे यांच्याकडे तब्बल नऊ वर्षांपासून जिल्हा काँग्रेसची सूत्रे आहेत. दीर्घकालापासून काँग्रेसची धुरा एकहाती का, असा प्रश्न काँग्रेस वर्तुळात चर्चिला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार यांच्या गोटात जिल्हाध्यक्षपदासाठी बरेच इच्छुक आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हे या मुद्यावर काहीच निर्णय घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वासनिकांचा मान म्हणून कुणीही उघडपणे बोलत नसले तरी आतून धुसफूस सुरू असून लवकरच असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत.

Congress president resigns - Part 1 For nine years? : Mohite, Rudrak, many in the Kedar group | जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी ! -- भाग १ नऊ वर्षे एकहाती धुरा का ? : मोहिते, मुळक, केदार गटात अनेक

जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये नाराजी ! -- भाग १ नऊ वर्षे एकहाती धुरा का ? : मोहिते, मुळक, केदार गटात अनेक

गपूर : जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयश मिळाल्यानंतरही जिल्हाध्यक्षपदी सुनीता गावंडे कायम आहेत. गावंडे यांच्याकडे तब्बल नऊ वर्षांपासून जिल्हा काँग्रेसची सूत्रे आहेत. दीर्घकालापासून काँग्रेसची धुरा एकहाती का, असा प्रश्न काँग्रेस वर्तुळात चर्चिला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार यांच्या गोटात जिल्हाध्यक्षपदासाठी बरेच इच्छुक आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक हे या मुद्यावर काहीच निर्णय घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे. वासनिकांचा मान म्हणून कुणीही उघडपणे बोलत नसले तरी आतून धुसफूस सुरू असून लवकरच असंतोषाचा स्फोट होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीता गावंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभा अशा तीन निवडणुका झाल्या. मात्र, तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेत असलेली सत्ता हातून गेली. लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना रामटेक मतदारसंघात मोठा पराभव पत्करावा लागला तर, विधानसभा निवडणुकीत सहाच्या सहाही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले. त्यावेळी नागपूर शहर काँग्रेसची धुरा जयप्रकाश गुप्ता यांच्याकडून विकास ठाकरे यांना देण्यात आली. मात्र, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांना कार्यकाळ पूर्ण होऊनही पदावर कायम ठेवण्यात आले. ही बाब पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना चांगलीच खटकली होती. मात्र, वासनिक यांनी हा निर्णय घेतला असल्यामुळे कुणी उघडपणे विरोध केला नाही.
दीड वर्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे. जिल्हा परिषद ही मिनी विधानसभेची निवडणूक मानली जाते. या निवडणुकीत ज्यांचा डाव साधला त्यांच्यासाठी पुढील निवडणुका आणखी सोप्या होतात. ग्रामीण राजकारणातील सत्तेची सूत्रे जिल्हा परिषदेतूनच हलविली जातात. मात्र, एवढी महत्त्वाची निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण नाही. निवडणुकीसाठी तयारी दिसत नाही. आहे तसे सुरू आहे. कार्यकाळ पूर्ण होऊनही गावंडे यांच्याकडेच अध्यक्षपदाचा कार्यभार असल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. राजेंद्र मुळक, आ. सुनील केदार यांच्या गोटात कमालीची नाराजी पसरली आहे. एकाच व्यक्तीकडे पद राहणार असेल तर आम्ही परिश्रम कशाला घ्यायचे, असा सवाल संबंधित कार्यकर्ते आपल्या नेत्यांना विचारू लागले आहेत.

Web Title: Congress president resigns - Part 1 For nine years? : Mohite, Rudrak, many in the Kedar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.