शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Congress President: "पक्षातील 50 टक्के पदे 50 वर्षांखालील नेत्यांसाठी राखीव", मल्लिकार्जुन खर्गे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:54 IST

Congress President: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळताच मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Congress President: काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या पदाची सूत्रे आज हाती घेतली. यावेळी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह पक्षातील सर्व बड्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी खर्गेंनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि एक मोठी घोषणाही केली. काँग्रेस नेत्यांना उद्देशून खर्गे म्हणाले की, एका सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्ष केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. सोनिया गांधींनी पक्षाची धुरा चोखपणे सांभाळली, मीही मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करेन.  यावेळी त्यांनी संघटनेतील 50 टक्के पदे 50 वर्षांखालील नेत्यांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा केली. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील विद्यमान सरकारवर सडकून टीका केली. नवीन भारतात रोजगार नाही, देशात महागाई शिगेला पोहोचली आहे. केंद्रातील सरकार झोपले आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून लोकांना टार्गेट केले जात आहे. आजच्या राजकारणात फक्त लबाडीचे वर्चस्व आहे, अशी टीका खर्गेंनी यावेळी केली.

सोनिया गांधी यांनी अभिनंदन केलेखर्गे यांचे अभिनंदन करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, "मी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन करते. सर्वात समाधानाची बाब म्हणजे अध्यक्षपदी निवडून आलेले खर्गे अनुभवी नेते आहेत. त्यांना पक्षाबद्दल अतिशय तळमळ आहे. एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन ही उंची गाठली आहे."

अनेक दिग्गजांनी खर्गेंचे अभिनंदन केले

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन करताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील म्हणाले, "खर्गे जी यांची धोरणे ही पंडित जवाहरलाल नेहरूंची धोरणे असतील. आपल्याला लोकशाही आणि समाजवाद मजबूत करायचा आहे, जातिव्यवस्था संपवायची आहे. त्यात काही नवीन धोरणांचाही समावेश असू शकतो." त्याच वेळी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, " सोनियाजींनी घेतलेला निर्णय यशस्वी करून पक्ष मजबूत करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे." 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी