शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Congress President Election: शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 15:27 IST

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 तर शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली.

Congress President Election: सूमारे दोन दशकानंतर काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर थरूर यांनी मल्लिकार्जुन खर्गेंची अभिनंदन केले. 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची प्रक्रिया आज पार पडली. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यांना 7897 तर शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली. थरूर यांनी खर्गे यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही केले आणि पक्षाच्या पुनरुज्जीवनाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे म्हटले. काँग्रेसचे अध्यक्ष होणे हा मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे. खर्गे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. एक हजाराहून अधिक मते मिळणे, हा माझ्यासाठी मोठा मान आहे, असेही ते म्हणाले. 

निवडणुकीत एकूण 9497 मतदान झालेकाँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या मतमोजणीत खर्गे यांना 7897 मते मिळाली, तर शशी यांना 1072 मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण 9497 मतदान झाले. खर्गे यांना काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा पाठिंबा मिळाला. 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एका नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. 

काँग्रेस मुख्यालयाबाहेर विजयाचा जल्लोषकाँग्रेस मुख्यालयाबाहेर खर्गे यांच्या विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. खर्गे यांचे समर्थक ढोल ताशांच्या गजरात त्यांचा विजय साजरा करत आहेत. विजयानंतर सचिन पायलट, गौरव गोगोई, तारिक अन्वर आदी नेत्यांनी खर्गे यांची भेट घेतली. याशिवाय मोठ्या संख्येने कार्यकर्तेही त्यांच्या घरी पोहोचत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेShashi Tharoorशशी थरूर