शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Congress President Election: 'माझं भविष्य खर्गे ठरवतील...', निकालापूर्वीच राहुल गांधींकडून पक्षाध्यक्षाच्या नावाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 17:47 IST

काँग्रेसची निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत, मात्र मतमोजणीपूर्वीच राहुल गांधींनी विजयी उमेदवाराचे नाव घेतले.

Congress President Election: सूमारे दोन दशकानंतर काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच पक्षाला गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यावर दणदणीत विजय मिळवला आहे. ही निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष असल्याचा दावा काँग्रेस नेते करत आहेत, पण बुधवारी मतमोजणीपूर्वीच पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला.

संबंधित बातमी- शशी थरूर यांच्या मल्लिकार्जून खर्गेंना शुभेच्छा; म्हणाले- 'पक्षाला नव्याने बळ देण्याचे काम आजपासून सुरू...'

दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालय मतमोजमी सुरू होती, तेव्हा राहुल गांधी आंध्र प्रदेशातील अडोनीणध्ये पत्रकार परिषद घेत होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “कांग्रेस अध्यक्षाकडे पक्षाचे सर्वोच्च अधिकार आहेत. पक्षातील प्रत्येक सदस्य अध्यक्षाला रिपोर्ट करेल. पक्षाचे नवीन अध्यक्ष माझी पक्षातील भूमिका ठरवतील. तुम्ही मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधींना विचारू शकता.”

निकालापूर्वीच खर्गेंचे नाव घेतलेदरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच राहुल गांधींनी खर्गे यांचे नाव घेतल्याने नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. पण नंतर आपले शब्द दुरुस्त करत राहुल म्हणाले की, “ज्या कोणाची निवड होईल, तो ठरवेल. खर्गे आणि थरूर हे अफाट अनुभव आणि समजूतदारपणा असलेले लोक आहेत, त्यांना माझ्या सल्ल्याची गरज नाही.”

मल्लिकार्जुन खर्गे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी खर्गे यांचे नाव घेतल्यानंतर काही वेळातच निकाल जाहीर झाला आणि खर्गे यांना अधिकृतपणे अध्यक्ष घोषित करण्यात आले. निवडणुकीत खरगे यांना 7,897 मते मिळाली तर शशी थरूर यांना 1,072 मते मिळाली. निवडणूक जिंकल्यानंतर 24 वर्षांनंतर खर्गे हे पहिले बिगर गांधी अध्यक्ष असतील. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेShashi Tharoorशशी थरूर