शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

Congress President Election: राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याची मागणी; राजस्थान आणि दिल्लीनंतर छत्तीसगडमध्ये ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 16:17 IST

Congress President Election: राहुल गांधी यांनीच काँग्रेसची जबाबदारी घ्यावी, ही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Congress President Election: राजस्थान (Rajasthan) आणि दिल्लीतील (Delhi) काँग्रेस कार्यकारीणीनंतर आज छत्तीसगड (Chhattisgarh)  काँग्रेसनेहीराहुल गांधींना (Rahul Gandhi) पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. काल हा ठराव जयपूर आणि दिल्लीतही मंजूर झाला. राहुल गांधींचे मन वळवण्याच्या काँग्रेस नेत्यांकडून प्रयत्न होत आहे. याचाच भाग म्हणून विविध राज्यात ठराव मंजूर केले जात आहेत.

छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेसच्या भावी अध्यक्षांना प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि इतर एआयसीसी (All India Cngress Comitee)  प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकारही दिले आहेत. पक्षाचे राज्य मुख्यालय 'राजीव भवन' येथे झालेल्या बैठकीत हे दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. बैठकीनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) म्हणाले की, त्यांनी राहुल गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

एकमताने ठराव मंजूरबघेल म्हणाले की, राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर पुन्हा बसवण्याचा प्रस्ताव मी ठेवला आहे. या प्रस्तावाला राज्यातील सर्व प्रमुखांनी एकमताने संमती दिली. मोहन मरकम यांनी AICC शिष्टमंडळ, प्रदेशाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांना कार्यकारिणीच्या स्थापनेसाठी अधिकृत करण्याचा प्रस्ताव मांडला. यालाही पाठिंबा देण्यात आला असून दोन्ही ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.

राजस्थान काँग्रेसकडून आला होता प्रस्ताव सीएम भूपेश बघेल म्हणाले की, अध्यक्ष मोहन मरकम यांना हा प्रस्ताव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी रिटर्निंग ऑफिसर मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे नेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव राजस्थान काँग्रेस कमिटीकडून आला आहे. छत्तीसगड हे दुसरे राज्य आहे जिथून हा प्रस्ताव जात आहे. असे प्रस्ताव इतर राज्यांतील काँग्रेसकडूनही येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचा विचार करावा.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीChhattisgarhछत्तीसगडdelhiदिल्लीRajasthanराजस्थान