Priyanka Gandhi Rahul Gandhi Congress: काँग्रेसमध्ये सध्या राहुल गांधी हे पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद आहे. पण २०२६ मध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पक्षात एक महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांना मोठ्या धुमधडाक्यात उत्तर प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तथापि, पक्षाच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर, अविनाश पांडे यांना त्यांच्या जागी उत्तर प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. तेव्हापासून प्रियांका गांधी काँग्रेसमध्ये कोणत्याही खात्याशिवाय सरचिटणीस म्हणून राहिल्या. पण आता त्यांना महत्त्वाची भूमिका मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रियांका गांधींची वट वाढणार...
प्रियांका गांधी प्रत्येक राज्यात स्टार प्रचारक म्हणून प्रचार करतात आणि असे संकेत आहेत की त्यांना एकाच राज्याचे प्रभारी बनवण्याऐवजी, प्रचार समिती प्रमुख किंवा निवडणूक व्यवस्थापन समिती असे पद निर्माण करून त्यांना नवीन जबाबदारी देण्यात येईल. दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणाले की प्रियांका गांधी यांचे एकमेव उद्दिष्ट राहुल यांना पंतप्रधान होताना पाहणे आहे. या विधानामुळे प्रियांका यांनाही पक्षसंघटनेत मोठे पद मिळणार असल्याच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत.
राहुल यांचा मात्र विरोध?
काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक डिसेंबर २०२३ नंतर होणार होती. त्यात राहुल गांधी यांना गांधी कुटुंबाचा हस्तक्षेप नको होता. त्यामुळेच मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि त्यासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यामुळे आता जर यामुळे प्रियांका गांधींना महत्त्वाची जबाबदारी दिली, तर खरगे यांच्या प्रतिष्ठेवर लगेच परिणाम होईल असा विश्वास निर्माण झाला होता. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना केवळ ९९ जागा मिळाल्या. त्यामुळे आता पक्षबांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने वेगळे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
राहुल यांचाच पक्षात वरचष्मा
सोनिया गांधी राजकीयदृष्ट्या सध्या फारशा सक्रीय नाहीत. त्यामुळे प्रियांका गांधी नवीन वर्षात पक्षात खात्याशिवाय महासचिव राहणार नाहीत. त्यांना नक्कीच महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. प्रियांका या राहुल यांच्या सहाय्यकाच्या भूमिकेत राहतील हे निश्चित आहे. त्यामुळे राहुल यांचाच पक्षात वरचष्मा राहिलं.
Web Summary : Priyanka Gandhi is likely to get a significant role in Congress in 2026, possibly leading a campaign or election management committee. While Rahul Gandhi remains influential, this move aims to strengthen the party after recent electoral setbacks, with Priyanka supporting Rahul.
Web Summary : प्रियंका गांधी को 2026 में कांग्रेस में महत्वपूर्ण भूमिका मिलने की संभावना है, शायद उन्हें अभियान या चुनाव प्रबंधन समिति का नेतृत्व सौंपा जाए। राहुल गांधी प्रभावशाली बने रहेंगे, लेकिन इस कदम का उद्देश्य हालिया चुनावी झटकों के बाद पार्टी को मजबूत करना है, जिसमें प्रियंका राहुल का समर्थन करेंगी।