शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनं मला 12 वर्षं छळलं, अमित शहांना तुरुंगात टाकलं; मोदींचा 'भावनिक' हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 19:51 IST

काँग्रेस आणि काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले, असे मोदी म्हणाले.

ठळक मुद्दे काँग्रेस आणि काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांवर भावनिक हल्लाआज देशात काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळेच देशातील राजकारण बदलत आहे

नवी दिल्ली - भाजपाच्या राष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांवर भावनिक हल्ला केला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना काँग्रेस आणि त्यांच्या हितचिंतकांनी, काँग्रेसच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या व्यवस्थेने सलग 12 वर्ष मला त्रस्त केले, असे मोदींनी सांगितले.  भाजपाच्या संमेलनात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ''मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस, त्याचे सहकारी, त्यांच्या इशाऱ्यावर चालणारी व्यवस्था, तसेच त्यांच्या रिमोटवर चालणारे नेते आणि अधिकाऱ्यांनी मला हर तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांनी मला छळण्याची एकही संधी सोडली नाही.'' ''2007 साली तर काँग्रेसचे एक मोठे नेते गुजरातमध्ये प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले होते की, मोदी काही महिन्यांत तुरुंगात जाईल. तर विधानसभेमध्ये काँग्रेसचे नेते भाषण द्यायचे की, मोदींनी तुरुंगात जायची तयारी करावी. आता मुख्यमंत्री आहात तर तुरुंगांचा साफसफाई व्यवस्थित ठेवा कारण तुम्हाला पुढचे जीवन तुरुंगातच काढायचे आहे,'' असे मोदींनी सांगितले.  आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांनी सीबीआयवर घातलेल्या बंदीबाबत बोलताना मोदींनी या निर्णयावर जोरदार टीका केली. ''आता सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निर्णय तुम्ही ऐकलाच असेल. या निर्णयामुळे यूपीए सरकारने मोदींना फसवा, अमित शाह यांना तुरुंगातच टाका, असा अजेंडा राबवला होता, हे  समोर आले आहे. पण आम्ही तेव्हा सीबीआयला गुजरातमध्ये येता येणार नाही, असा नियम बनवला नव्हता. आमच्याकडे सत्ता होती. कायदे कानूनही ठावूक होते. पण आमचा सत्य आणि न्यायावर विश्वास होता.''असा टोला मोदींनी लगावला. देशात काळापैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई केली जात आहे. त्यामुळेच देशातील राजकारण बदलत आहे, असा दावाही मोदींनी केला.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण