शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिवाळीनंतर राहुल गांधींकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:46 IST

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कदाचित दिवाळीनंतर पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, असे पक्षाचे राजस्थानमधील युवानेते सचिन पायलट यांना वाटते.

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कदाचित दिवाळीनंतर पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, असे पक्षाचे राजस्थानमधील युवानेते सचिन पायलट यांना वाटते.‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पायलट म्हणाले की, राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी, अशी पक्षात सर्वसाधारण भावना आधीपासूनच आहे. पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून ते बरेच कामही करत आहेत, पण त्यांची पक्षाध्यक्षपदी बढती यथोचित वेळी व्हावी, असे पक्षाचे मत आहे. आता ती वेळ आली आहे, असे मला वाटते. पक्षात संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. त्या झाल्या की, नवा अध्यक्ष दिवाळीनंतर लगेचच सूत्रे स्वीकारेल, असे वाटते.प्रियंका गांधी यांनीही पक्षात पद स्वीकारून सक्रिय राजकारणात यावे का, असे विचारता पायलट म्हणाल्या, प्रियंका काँग्रेसमध्ये आहेतच.सक्रिय राजकारणात उतरायचे का व केव्हा? याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. घराणेशाहीचे राजकारण आणि काँग्रेसवर घराणेशाहीचा केला जाणारा आरोप याविषयी ते म्हणाले की, राजकारणात नेत्याचे आडनाव ही अपात्रता ठरू नये. एखाद्या घराण्यातील असण्याचा एका मर्यादेपर्यंत फायदा होऊ शकतो, परंतु शेवटी तुम्ही काम काय व किती करता, लोकांची मने कशी जिंकता, यावरच तुमचे यश अवलंबून आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाºया भाजपामध्येही अनेक नेतेही घराणेशाहीनेच आलेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.अमेथी दौºयावरून वाद; तारखा बदलण्याच्या सूचनालखनऊ : राहुल गांधी यांनी येत्या४ ते ६ आॅक्टोबर असा अमेथी या आपल्या मतदारसंघाचा दौरा योजला आहे, परंतु त्या वेळी पोलीस व प्रशासन कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात व्यग्र राहणार असल्याचे गांधी यांच्या दौºयाच्या तारखा बदलाव्या, असे पत्र जिल्हा प्रशासनाने पक्षाला लिहिले आहे. काँग्रेसने यावर टीका केली. राहुल गांधीयेऊन अडचणीचे मुद्दे सांडतील, म्हणून योगी आदित्यनाथ सरकार त्यांचा दौरा होऊ नये, असा पाहात आहे. जमल्यास केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या १० आॅक्टोबरच्या दौºयानंतर राहुल आले तर बरे, असा सरकारचा प्रयत्न दिसतो, असा आरोप पक्षाने केला.सचिन पायलट म्हणाले की, ज्येष्ठांना अडगळीत टाकून, त्यांची मानखंडना करण्याची काँग्रेसची परंपरा नाही. भाजपाचे ‘मार्गदर्शक मंडळ’ ही सर्वात मोठी विडंबना आहे. पक्षात वयाची ठरावीक मर्यादा असू नये. प्रश्न पक्ष नव्या पिढीकडे सोपविण्याचा नाही. ज्येष्ठ व तरुण यांनी एकत्र येऊन काम करणे, नक्कीच गरजेचे आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी