शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

काँग्रेसचा पक्षाध्यक्ष गांधी घराण्यातील नको- प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 6:13 AM

प्रदीप छिब्बर व हर्ष शाह या दोघांनी मिळून संपादन केलेल्या इंडिया टुमारो हे पुस्तक लिहिले आहे. त्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत हे वक्तव्य आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदी यापुढे गांधी घराण्यातील व्यक्ती नको, या प्रियांका गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर त्या पक्षाचे बहुतांश नेते जाहीर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. प्रदीप छिब्बर व हर्ष शाह या दोघांनी मिळून संपादन केलेल्या इंडिया टुमारो हे पुस्तक लिहिले आहे. त्यात काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत हे वक्तव्य आहे.प्रियांका गांधी यांच्या वक्तव्याचे काँग्रेसमधील फक्त शशी थरुर यांनीच जाहीर समर्थन केले आहे. इंडिया टुमारो या पुस्तकाचे लेखक हर्ष शाह मॅकेन्झीशी संबंधित असून ते अमेरिकेतील बोस्टन येथे कार्यरत आहेत तर प्रदीप छिब्बर हे कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संबंधित आहेत. या पुस्तकामध्ये राहुल गांधी, अखिलेश यादव, स्मृती इराणी आदी नेत्यांच्या मुलाखतीही प्रसिद्ध करण्यात आल्या असून हे पुस्तक आॅक्सफर्डने प्रकाशित केले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाची मुदत संपली असून त्याच वेळेस हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याने काँग्रेसमध्ये त्यातील प्रियांका गांधी यांच्या मुलाखतीवरून कुजबूज सुरू झाली.>राहुल गांधी यांनाउघड विरोध नाहीराहुल गांधी यांना अध्यक्ष करू नये असे मत असलेला एक गट पक्षामध्ये आहे. मात्र ते राहुल गांधी यांना जाहीररित्या विरोध करू इच्छित नाहीत. त्यामुळेच प्रियांका गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाबाबत मत व्यक्त करूनसुद्धा काँग्रेस नेते गप्प आहेत. अहमद पटेल, पी. चिदम्बरम यांच्यासारखे नेतेही काहीच प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. मात्र राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व्हावे असे मत ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी याआधीच व्यक्त केले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधी