शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

Corona Vaccine: “होय, मी चुकलो, माझी भूमिका...”; PM मोदींवर केलेल्या टीकेनंतर चिदंबरम यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 11:50 IST

Corona Vaccine: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना चूक झाल्याची कबुली दिली असून, महत्त्वाचा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होताना दिसत आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्यानंतर आता त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांनी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून २०२१ नंतर १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळण्याबाबत घोषणा केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारांवर जबाबदार धरल्याबाबत केंद्रावर टीका होताना पाहायला मिळत आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना चूक झाल्याची कबुली दिली असून, महत्त्वाचा खुलासा केला आहे. (congress p chidambaram clarifies  i was wrong i stand corrected after criticism on pm modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा केली. १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे. २१ जूनपासून केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून लसीची खरेदी करून राज्यांना पुरवेल. त्यामुळे राज्यांना लसीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्रावर सरकारवर टीका केली होती.

होय, मी चुकलो, माझी भूमिका दुरुस्त केली

पंतप्रधान मोदी राज्य सरकारांना दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करू नये, असे कुणीही म्हटलेले नाही, असे पी. चिदंबरम यांनी टीका करताना म्हटले होते. मात्र, सोशल मीडियावरील एक युझरने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींकडे अशा पद्धतीची विनंती केल्याचे पत्र पोस्ट केले. राज्य सरकारला थेट लस खरेदी करण्याची परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती. याची माहिती एएनआयकडे विचारली होती. माझी चूक झाली. मी माझी भूमिका दुरुस्ती केल आहे, अशी कबुली देत पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे. 

प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटवण्याची मागणी; पाण्याखाली तब्बल १२ तास उपोषण

दरम्यान, केंद्र सरकार आपल्या चुकांमधून शिकले आहे, हाच या घोषणेचा अर्थ होतो. त्यांनी दोन चुका केल्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे दिशाभूल करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतःच्या चुकांसाठी विरोधकांना दोषी ठरवले. केंद्राने लस खरेदी करू नये असे कुणीही म्हटले नव्हते. आता राज्यांवर आरोप करत, राज्यांना थेट लस खरेदी करायची होती. त्यामुळे केंद्राने परवानगी दिली, असे पी. चिदंबरम टीका करताना म्हणाले होते.   

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याP. Chidambaramपी. चिदंबरमCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस