शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'ते राष्ट्रवादीचे वैयक्तिक विचार, आम्ही...' शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 22:19 IST

'हिंडेनबर्गने अदानींना टार्गेट केलं, JPC चौकशीची गरज नाही'- शरद पवार

Congress on Sharad Pawar : एकीकडे काँग्रेस अदानी समुहाप्रकरणी जेपीसीची मागणी करत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही चौकशी करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. एनडीटीव्ही वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणाले की, हिंडेनबर्गने अदानी समूहाला टार्गेट केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना म्हटले की, अदानींचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडलेले आहे, त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. पवारांचे वैयक्तिक विचार असू शकतात, पण इतर 19 समविचारी पक्षांचा असा विश्वास आहे की, हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याप्रकरणी जेपीसीद्वारे चौकशी झालीच पाहिते. एका मुद्द्यावर राष्ट्रवादीचे वेगळे मत असले तरीदेखील भाजपच्या विरोधात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह इतर 20 समविचारी विरोधी पक्ष एकजूट आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार?वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानींना क्लीन चिट दिली. हिंडेनबर्गवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या रिपोर्टमधून अदानी समूहाला टार्गेट करण्यात आल्याचे दिसते. मात्र, अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. याआधीही अशी विधाने समोर आली आणि अनेक दिवस संसदेत गदारोळ झाला, मात्र यावेळी अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानीबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

जेपीसी चौकशीची गरज नाही अदानी प्रकरणात जीपीसी चौकशीबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला. याबाबत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही. जेपीसी चौकशी झाली तरी देखरेख सत्ताधारी पक्षाकडे असेल आणि सत्ताधारी पक्षाकडे बहुमत आहे. अशा परिस्थितीत सत्य कसे बाहेर येईल? आता अदानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञांची समिती स्थापन करून चौकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत जेपीसी चौकशीची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसGautam Adaniगौतम अदानीBJPभाजपा