शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जुने पराभव विसरून नव्या जोमाने सुरुवात; बिहार फत्ते करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 21:22 IST

Congress on Bihar Election : या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये निवडणुका होत असून, यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.

Congress on Bihar Election : मागील काही निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पुन्हा सक्रिय झाली आहे. काँग्रेसने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यंदा काँग्रेसची नजर बिहारमधील दलित व्होटबँकेवर आहे. याच रणनीतीअंतर्गत राहुल गांधींनी या वर्षात आतापर्यंत दोनदा पाटण्याचा दौरा केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या महिन्यात बिहारमध्ये दोन सभा घेणार आहेत. त्यानंतर प्रियंका गांधी मार्चमध्ये कार्यक्रम बिहारला जात आहेत. पक्षाने आपल्या राज्य नेतृत्वालाही निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

खरगेंच्या बॅक टू बॅक सभामल्लिकार्जुन खरगे येत्या 22 फेब्रुवारीला बक्सर येथे सभा घेणार आहेत. तर, त्यानंतर 28 फेब्रुवारीला पश्चिम चंपारणमध्येही खरगेंच्या सभेची तयारी सुरू आहे. खरगेंच्या सभांना जय बापू, जय भीम, जय संविधान अशी नावे देण्यात आली आहेत. याद्वारे काँग्रेसला बिहारमधील दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी राहुल गांधींच्या दोन्ही कार्यक्रमांचा भर फक्त दलित मतदारांवर होता. 

काँग्रेस-राजद युतीमध्ये एकही मोठा दलित नेता नाहीबिहारमधील पासवान समाजातील चिराग पासवान आणि जीतन राम मांझी हे मांझी समाजाचे मोठे नेते असून, दोघेही सध्या एनडीएचा भाग आहेत. या दोन जातींशिवाय बिहारमध्ये दलित समाजाची मोठी संख्या आहे, पण काँग्रेस-राजद युतीमध्ये एकही मोठा दलित नेता नाही. बिहारमध्ये या समाजात शिरकाव करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. पण प्रश्न असा पडतो की काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व सतत बिहारचे दौरे का करत आहे? बिहारमध्ये काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे का?

काँग्रेसला ताकद दाखवायची आहेसूत्रांचे म्हणणे आहे की, काँग्रेस एकट्याने निवडणूक लढवणार नाही, पण काँग्रेसला आरजेडीसोबत जागावाटप करण्यापूर्वी आपली ताकद दाखवायची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्तर जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी केवळ एकोणीस जागा जिंकता आल्या. काँग्रेसमुळे तेजस्वी मुख्यमंत्री होऊ शकले नाही, असा संदेश गेला होता. अशा स्थितीत यंदा राजद काँग्रेसला चाळीसपेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. याशिवाय इतर काही पक्षही जागांची मागणी करत आहेत. 

यामुळेच काँग्रेसला बिहारमधील आघाडीत सक्तीच्या आघाडीऐवजी मजबूत भागीदाराची भूमिका बजावायची आहे. आपल्या जागांचा कोटा कायम ठेवण्याबरोबरच काँग्रेस भक्कम जागा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वेळी काँग्रेसला त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्या नाहीत. यावेळी त्यांच्या पसंतीच्या जागा मिळाल्यास कमी जागांवर तडजोड होऊ शकते, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारBJPभाजपा