शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
2
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
3
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
4
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
5
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
6
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
7
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
8
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
9
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."
10
LG सारख्या लिस्टिंगचे संकेत देतोय 'हा' आयपीओ; २९ तारखेपासून खुला होणार, किती आहे GMP, पाहा डिटेल्स
11
थायलंडच्या 'मातृतुल्य' पूर्व महाराणी सिरिकिट यांचे निधन, दीर्घकाळ आजाराशी दिली झुंज
12
Marriage Astro Tips: लग्न ठरवताना घाई केली, तर भविष्यात हर्षल नेपच्युन देऊ शकतो धोका!
13
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
14
हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली
15
"हा फक्त सिनेमा नाही तर एक यज्ञ आहे"; 'रामायण' सिनेमात लक्ष्मण साकारणाऱ्या अभिनेत्याची भावना
16
प्रामाणिक करदात्यांसोबत नम्रपणे वागा, बेईमानी करणाऱ्या.., पाहा अधिकाऱ्यांना काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?
17
"मुलाला टाक, आपण लग्न करू..."; 'आई' असणाऱ्या गर्लफ्रेंडने नकार देताच बॉयफ्रेंडने चिमुकल्याला संपवलं!
18
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
19
'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
20
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 

गोडसे भक्तांसाठी अच्छे दिन; प्रज्ञा सिंह यांच्या निवडीवरून काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 13:12 IST

प्रज्ञा सिंह यांच्या संरक्षण मंत्रालय समितीतील निवडीवरून काँग्रेसचा टोला

ठळक मुद्देप्रज्ञा सिंह यांच्या संरक्षण मंत्रालय समितीतील निवडीवरून काँग्रेसचा टोलासंरक्षण खात्याच्या समितीत प्रज्ञा सिंह यांना स्थान देण्याचा निर्णय दूर्दैवी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. नथुराम गोडसेच्या भक्तांचे चांगले दिवस आल्याचा टोलाही काँग्रेसच्या एका नेत्याने लगावला

नवी दिल्ली - भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या समितीत ठाकूर यांना स्थान देण्यात आले असून या समितेचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत संरक्षण खात्याच्या समितीत प्रज्ञा सिंह यांना स्थान देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण 21 सदस्य आहेत. वादग्रस्त वक्तव्य करुन प्रज्ञा सिंह नेहमीच चर्चेत असतात. समितीत स्थान दिल्यामुळे काँग्रेसनेभाजपावर निशाणा साधला आहे. 

संरक्षण खात्याच्या समितीत प्रज्ञा सिंह यांना स्थान देण्याचा निर्णय दूर्दैवी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. कमलनाथ सरकारचे मंत्री पीसी शर्मा यांनी भाजपा जसं बोलतो तसं वागत नाही. पंतप्रधानांनी प्रज्ञा सिंह यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं होतं. मात्र अद्याप असं काही झालेलं नाही असं म्हणत भाजपावर टीका केली आहे. नथुराम गोडसेच्या भक्तांचे चांगले दिवस आल्याचा टोलाही काँग्रेसच्या एका नेत्याने लगावला आहे. 

काँग्रेसचे नेते जयवीर शेरगिल यांनी भाजपा सरकारने राष्ट्रवादाचं नवं मॉडल दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रज्ञा सिंह यांना माफ केलं जाणार नाही असं म्हटलं होतं. मात्र आता गोडसे भक्तांसाठी अच्छे दिन आल्याचं म्हटलं आहे. शेरगिल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रज्ञा सिंह यांच्या संरक्षण मंत्रालय समितीतील निवडीवरून टोला लगावला आहे. तसेच काँग्रेसने ही ट्विट करून भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

संरक्षण खात्याच्या समितीत अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांचा समावेश आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपुत्र म्हटलं होतं. 

प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते.  

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीNathuram Godseनथुराम गोडसे