शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काँग्रेसला हवे मजबूत संघटन, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची खास मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 07:33 IST

Ghulam Nabi Azad : आपल्या मुलाखतीत आझाद यांनी एकेकाळी पक्षात युवक काँग्रेसला कसे महत्त्व होते याच्या आठवणी जागवल्या. १९७५ च्या आसपास पक्षात एक काळ असा होता की, नेते पक्ष सोडून गेले होते परंतु कार्यकर्ते पक्षात कायम होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद म्हणजे काँग्रेसमधील इंदिरा गांधी यांच्या काळापासून असलेले ज्येष्ठ नेते. परंतु आज आझाद यांचा समावेश पक्षात असंतुष्ट नेत्यांमध्ये केला जातो. भाजपच्या आक्रमक राजकारणाला तोंड द्यायचे असेल तर पक्षाला आता अल्प आणि दीर्घ मुदतीचे नियोजन करावे लागेल. त्यानुसार नेत्यांची जडणघडण करावी लागेल. थेट लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जमिनीवरील संघटना मजबूत करण्यावर भर द्यावी लागेल, असे मत गुलाम नबी आझाद यांनी ‘लोकमत’चे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. (Congress needs strong organization to reach out to the people, exclusive interview with senior leader Ghulam Nabi Azad)

आपल्या मुलाखतीत आझाद यांनी एकेकाळी पक्षात युवक काँग्रेसला कसे महत्त्व होते याच्या आठवणी जागवल्या. १९७५ च्या आसपास पक्षात एक काळ असा होता की, नेते पक्ष सोडून गेले होते परंतु कार्यकर्ते पक्षात कायम होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

एकदा पक्षनेतृत्वाला पूर्वकल्पना देऊन पत्नीसह युरोप आणि मॉस्कोच्या दौऱ्यावर गेलो असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मध्येच परत बोलावून घेतले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात आपला समावेश करून घेतला,  हा प्रसंगही त्यांनी या मुलाखतीत विशद केला. 

गुलाम नबी आझाद म्हणाले की,  तेव्हा असलेल्या आव्हानांची तुलना आजच्या दिवसांशी करता येणार नाही. सध्या एकमेकांशी संपर्काचा जमाना असल्याने ट्विटर, फेसबुक, एसएमएस आदी त्यासाठी पूरकच आहे परंतु पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष गावात जाऊनच काम करावे लागेल.    

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादinterviewमुलाखत