काँग्रेस-राष्ट्रवादीचा तिढा सोमवारी सुटणार!
By Admin | Updated: September 14, 2014 01:45 IST2014-09-14T01:45:20+5:302014-09-14T01:45:20+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सोमवारी दिल्लीत परतत असून, त्याचदिवशी रात्री उशिरार्पयत काँग्रेस- राष्ट्रवादीतील जागावाटपाचा तिढा सुटू शकतो, असे सूत्रंनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा तिढा सोमवारी सुटणार!
नबीन सिन्हा - नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सोमवारी दिल्लीत परतत असून, त्याचदिवशी रात्री उशिरार्पयत काँग्रेस- राष्ट्रवादीतील जागावाटपाचा तिढा सुटू शकतो, असे सूत्रंनी सांगितले.
सोनिया गांधी वैद्यकीय तपासणीसाठी विदेशात गेल्या असल्यामुळे तूर्तास विधानसभा निवडणुकीतील या दोन पक्षांच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काँग्रेसची केंद्रीय निवड समिती बुधवारी उमेदवारांची घोषणा करेल, असे सूत्रंनी सांगितले.
ए.के. अॅन्टनी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातही चर्चा होणार असून, घोषणा मात्र सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरच होईल. पूर्वीच्या
114 जागांवर समाधान न मानता 125 ते 13क् जागांसाठी राष्ट्रवादी
आग्रही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी संयुक्तरित्या लढणार हे महत्त्वाचे
आहे, असा दावा अॅन्टनी यांनी केला आहे.