शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अखेर जुळले; दोन्ही पक्ष लढवणार प्रत्येकी २४ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 6:10 AM

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या जागांबाबत समझोता झाला असून, त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी २४ जागा येणार आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभेच्या जागांबाबत समझोता झाला असून, त्यानुसार दोन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी २४ जागा येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय झााला. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनाही माहिती दिली गेली.

काँग्रेसच्या कोअर समितीच्या बैठकीत या समझोत्यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस स्वत: २६ जागा लढवू इच्छित होती आणि राष्ट्रवादीला २२ जागा देण्याचीच त्या पक्षाची तयारी होती. मात्र काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हे वाद संपवण्यासाठी जागावाटपाचे सर्वाधिकार शरद पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या पाच महिन्यांत पवार व राहुल गांधी यांची चार वेळा भेट झाली होती.भाजपाविरोधी पक्षनेत्यांची बैठक

शरद पवार यांच्या दिल्लीतील गुरूद्वारा रकाबगंज मार्गावरील निवासस्थानी गुरुवारी देशातील समविचारी पक्षांच्या नेत्यांचीहीबैठक झाली. या बैठकीला प्रफुल पटेल, सुप्रिया सुळेंसह काँग्रेसचे अहमद पटेल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम येचुरी, बसपाचे सतीश मिश्रा, सपाचे राम गोपाल यादव, जया बच्चन, तृणमूलचे डेरेक ओब्रायन, भाकपचे डी. राजा, राजदच्या मिसा भारती आदी अनेक नेते उपस्थित होते.

भाजपाविरोधात पुरोगामी व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्यावर तिथेही एकमत झाले. मात्र त्यास महागठबंधन वा महाआघाडी म्हणण्यास या नेत्यांनी सध्या तरी नकार दिला आहे.इतर पक्षांना देणार आपल्या वाट्यातील जागा

शरद पवार हे महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी (आंबेडकर गट), माकप, बहुजन विकास आघाडी, शेकाप, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी आघाडीसंदर्भात चर्चा करीत होते.

आपल्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत, त्यातून दोन्ही पक्षांनी इतरांना कोणत्या जागा सोडायच्या हे ठरवायचे आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी समझोत्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, आता केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस