शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"पंजाबमध्ये जंगलराज आणि अराजकता"; नवज्योत सिंग सिंद्धूंचा AAP वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:46 IST

पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पुन्हा एकदा 'आप'च्या नवनिर्वाचित सरकारवर निशाणा साधला आहे. 

पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पुन्हा एकदा भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखालील 'आप'च्या नवनिर्वाचित सरकारवर निशाणा साधला आहे. सोमवारी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. "या ठिकाणी जंगलराज आहे. पंजाबमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे. या ठिकाणी कोणलाच कायद्याचा धाक नाही," असं सिद्धू म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्याच्या कथित हत्येप्रकरणी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सिद्धू लुधियानाला पोहोचले होते. तेव्हा त्यांनी पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. "मी पंजाबमध्ये अशी अराजकता यापूर्वी कधीही पाहिली नाही. कोणालाही कायद्यचा धाक नाही. हे जंगलराज आहे. दिवसाधवळ्या हत्या केल्या जात आहेत," असं सिद्धू म्हणाले. 

"ज्यांनी लोकांना उत्तर दिलं पाहिजे असे लोक गुजरातमध्ये आहेत. पंजाबच्या लोकांवर दररोज हल्ले होत आहेत. गुरुदासपूरमध्ये चार जणांची हत्या करण्यात आली. लुधियानामध्येही हत्या झाली होती. संपूर्ण साज्यात अशा घटना घडत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे," असं म्हणत त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

जर हे दिल्लीत घडलं असतं तर...सानौरमध्ये एका काँग्रेस नेत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा दावा करत सिद्धू यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. "तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगत तुमचे लोक दिल्लीत न्यायालयात जात आहेत. पंजाबमधील लोकांच्या जीवाचीही काळजी करा. जर दे दिल्लीत घडलं असतं तर तुम्ही याला गुंडगिरी म्हटलं असतं. आता पाहा पंजाबमध्ये काय होतंय पाहा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे," असंही सिद्धू ट्वीट करत म्हणाले होते.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मानArvind Kejriwalअरविंद केजरीवाल